फलटणमध्ये चायना मांजाच्या विक्रेते व वापरणारांवर कारवाई करण्याची मागणी
विशाल कांबळे- Sat 30th Jul 2022 11:41 am
- बातमी शेयर करा
फलटणचे वनक्षेत्रपाल तसेच फलटण उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली 20 वर्ष वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात काम करत आहोत. या दरम्यान काही वर्षांमध्ये चायना मांजामुळे हजारो पक्षी जखमी होवून त्यांना जीवास मुकावे लागले आहे. तसेच बऱ्यास नागरिकांना अपघातास सामोरे जावे लागले आहे. आमच्या संस्थेने सन 2017 व 2018 रोजी याच मागणीचे निवेदन आपल्या कार्यालयात सादर केले होते. यावेळी चायना मांजाच्या अवैध विक्री व वापर यावर कारवाईची हमी संस्थेला देण्यात आली होती.
सातारा : नागपंचमी सणानिमित्त उडवल्या जाणाऱ्या पंतगींसाठी वापरण्यात येणाऱ्या चायना मांजामुळे हजारो पक्षांचे जीव जात आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने 2016 सालीच चायना मांजाच्यावर बंदी घातलेली असताना देखील सातारा जिल्ह्यात खुलेआम मांजा विक्री व त्याचा वापर सुरु आहे. फलटण शहरात पाहणी केली असता मांजा विक्रेत्यांकडे भरपूर साठा उपलब्ध असून खुलेआम विक्री सुरु आहे. या विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन व रिसर्च सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अमित सय्यद व प्राणीमित्रांनी केली आहे.याबाबत फलटणचे वनक्षेत्रपाल तसेच फलटण उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली 20 वर्ष वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात काम करत आहोत. या दरम्यान काही वर्षांमध्ये चायना मांजामुळे हजारो पक्षी जखमी होवून त्यांना जीवास मुकावे लागले आहे. तसेच बऱ्यास नागरिकांना अपघातास सामोरे जावे लागले आहे. आमच्या संस्थेने सन 2017 व 2018 रोजी याच मागणीचे निवेदन आपल्या कार्यालयात सादर केले होते. यावेळी चायना मांजाच्या अवैध विक्री व वापर यावर कारवाईची हमी संस्थेला देण्यात आली होती.मात्र, आजमितीस पाहणी केली असता आज लोक खुलेआम चायना मांजाचा वापर आणि विक्री करत असल्याचे दिसत आहे. आमच्याकडे येणारे बहुतांश जखमी पक्षी हे चायना मांजामुळे जखमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच फलटण शहरामध्ये जावून पाहणी केली अगता असे लक्षात आले की, पतंग आणि मांजा विक्रेत्यांकडे चायना मांजाचा भरमसाठ उपलब्ध असून ते खुलेेआम मांजा विकत आहेत. काही वर्षापूर्वी याच चायना मांजामुळे एका मुलाचा गळा कापून जीव गेल्याची तसेच एका महिलेेचा जीव गेल्याची घटना आपल्या येथे घड़ली होती. या चायना मांजाचा पक्षी तसेच माणसांना मोठा धोका आहे.वास्तविक पक्षी हे अन्न साखळीतील प्रमुख घटक असून निसर्गासाठी मोलाची कामगिरी बजावत असतात. पावसाळ्यात बहुतांश पक्षांची पिल्ले बाहेर पडलेली असतात. मात्र, नागपंचमीनिमित्त उडवण्यात येणाऱ्या पंतगांसाठी मांजाचा वापर होतो आणि यामध्ये पक्षी जखमी होवून त्यांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे वनविभाग तसेच पोलीसांकडून चायना मांजाचा वापर करणाऱ्यांवर तसेच विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी असून कारवाई न झाल्यास जे परिणाम होत आहेत त्याची जबाबदारी प्रशासनावर येते. कारवाई न झाल्यास संबंधितांवर कारवाई करावी यासाठी प्राणी मित्रांकडून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा डॉ. सय्यद यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक तसेच वनविभागाचे वनक्षेत्रपाल यांना देण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
#sataranews
#sataranewsonline
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 30th Jul 2022 11:41 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 30th Jul 2022 11:41 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 30th Jul 2022 11:41 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 30th Jul 2022 11:41 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 30th Jul 2022 11:41 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 30th Jul 2022 11:41 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sat 30th Jul 2022 11:41 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 30th Jul 2022 11:41 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 30th Jul 2022 11:41 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 30th Jul 2022 11:41 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 30th Jul 2022 11:41 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 30th Jul 2022 11:41 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sat 30th Jul 2022 11:41 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sat 30th Jul 2022 11:41 am











