शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?
शाळेच्या परिसरात मटका सुरू असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!Satara News Team
- Sat 21st Nov 2026 12:08 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरातील करंजे पेठ परिसरात एका शाळेच्या अगदी शेजारी मटक्याचा अड्डा सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. शाळेच्या आसपास विद्यार्थ्यांची वर्दळ असताना अशा प्रकारचा अवैध व्यवसाय सुरू होत असेल, तर हा प्रकार केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे.
शहरात अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा दावा केला जात असताना, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या शाळेच्या शेजारीच मटक्याचा अड्डा सुरू होण्याचे धाडस नेमके कोणाच्या भरोशावर? संबंधित व्यावसायिकाला पोलिसांचा धाक नाही की कारवाई होणार नसल्याची खात्री आहे? तसेच या मटका बहाद्दरावर नेमका कोणाचा 'राजा'शीर्वाद आहे? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
शाळेच्या परिसरात अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याची माहिती संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचली आहे का? पोहोचली असेल, तर अद्याप कारवाई का झाली नाही? आणि माहिती नसेल, तर शहरातील अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवण्याची यंत्रणा नेमकी काय करते?
शाळेच्या आसपासच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे अपेक्षित असताना, अशा आरोपांकडे दुर्लक्ष होणे नागरिकांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारे आहे.
मटका बहाद्दराला कायद्याचा धाक उरला नाही?
अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे मनोबल वाढत असेल आणि त्यांना कारवाईची भीती वाटत नसेल, तर त्याचा परिणाम सातारा शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा होऊ शकतो. करंजे पेठेतील या कथित मटका अड्ड्यावर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वतः लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शाळेच्या परिसरात शिक्षणाचे वातावरण हवे, जुगाराचे नाही!
पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, शाळेच्या शेजारीच जुगाराचे अड्डे सुरू असल्याच्या तक्रारी निर्माण होत असतील, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे साहजिक आहे.
करंजे परिसरातील या प्रकाराची पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, शाळेच्या परिसरातील वातावरण सुरक्षित करावे आणि जुगाराच्या कथित अड्ड्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांमधून होत आहे.
आता पाहायचे एवढेच, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पोलीस अधीक्षक या प्रकरणात प्रत्यक्ष कारवाई करणार की करंजेतील हा कथित जुगाराचा बाजार असाच सुरू राहणार?
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणार का, हा आता सर्वसामान्य नागरिकांचा सवाल आहे. करंजे परिसरातील कथित मटका आणि तीन पत्तीच्या अड्ड्यांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासावी. या प्रकारात कोणी सहभागी आहे, जुगाराचे व्यवहार कुठून चालतात आणि त्यामागे कोण आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
स्थानिक बातम्या
शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?
- Sat 21st Nov 2026 12:08 pm
मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
- Sat 21st Nov 2026 12:08 pm
पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म
- Sat 21st Nov 2026 12:08 pm
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
- Sat 21st Nov 2026 12:08 pm
दुर्योधनाच्या अहंकारामुळे महाभारत... जयकुमार गोरेंचा तोच अहंकार भाजपला नडणार ?
- Sat 21st Nov 2026 12:08 pm
चोराडे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जिवदान.
- Sat 21st Nov 2026 12:08 pm
संबंधित बातम्या
-
चोराडे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जिवदान.
- Sat 21st Nov 2026 12:08 pm
-
वर्दीतील दर्दी! कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करणारे पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर.
- Sat 21st Nov 2026 12:08 pm
-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेबेवाडीत राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
- Sat 21st Nov 2026 12:08 pm
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sat 21st Nov 2026 12:08 pm
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sat 21st Nov 2026 12:08 pm
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sat 21st Nov 2026 12:08 pm











