शाळेच्या उंबरठ्यावर जुगाराचा बाजार सुरूच; शाहूपुरी पोलिसांचे 'अर्थपूर्ण' मौन की 'राजा'श्रयापुढे प्रशासन हतबल?

बातमी प्रसिद्ध होऊनही करंजे पेठेतील मटक्याचा अड्डा जोमात! 'खाकी'ला कोणाची भीती की आकड्यांचा 'अर्थ'पूर्ण खेळ?

सातारा शहरातील करंजे पेठ परिसरात एका शाळेच्या अगदी शेजारी सुरू असलेल्या मटका आणि तीन पत्तीच्या अवैध अड्ड्याबाबत वृत्त प्रसिद्ध होऊन चार दिवस उलटले तरी हा जुगाराचा बाजार राजरोसपणे सुरूच असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.


         बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याची यंत्रणा खडबडून जागी होईल आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या अड्ड्यावर हातोडा पडेल, अशी पालक व स्थानिक नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, कारवाई तर दूरच, उलट संबंधित मटका बहाद्दराने अधिकच निर्ढावलेल्या वृत्तीने आपला धंदा तेजीत सुरू ठेवल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


           करंजे पेठेतील शाळेच्या परिसरात दररोज शेकडो शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ असते. अशा संवेदनशील ठिकाणी जुगाराचे आकडे लावले जात असताना पोलीस प्रशासनाने घेतलेली बघ्याची भूमिका नागरिकांना अस्वस्थ करणारी आहे. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरही जर अवैध धंदे बंद होत नसतील, तर या मटका चालकाला स्थानिक पोलिसांचा अजिबात धाक उरलेला नाही का, मटका बहाद्दराला नेमका कोणाचा धाक उरला नाही? असा सवाल विचारला जात आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार राजरोस सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण पथक (डीबी) आणि गस्त घालणारे कर्मचारी नेमके कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.

'राजा'शीर्वादापुढे कायदा वाकला का?

पहिल्या बातमीत उपस्थित करण्यात आलेला 'राजा'शीर्वादाचा मुद्दा या घटनेमुळे अधिकच गडद झाला आहे. सामान्य नागरिकाने वाहतूक नियमांचे थोडे जरी उल्लंघन केले, तर तत्परतेने कारवाई करणारे पोलीस प्रशासन शाळेच्या शेजारी सुरू असलेल्या या उघड जुगाराकडे डोळेझाक का करत आहे? या अवैध धंद्यातून मिळणाऱ्या 'अर्थ'पूर्ण व्यवहारांची साखळी नेमकी कुठपर्यंत पोहोचली आहे आणि या मटका अड्ड्याला अभय देणारा तो अदृश्य 'हात' कोणाचा, याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे.




   पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे थेट कारवाई करणार का?


         स्थानिक पोलीस ठाण्याकडून कोणतीही ठोस हालचाल होत नसल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. शाळेच्या परिसरातील शैक्षणिक वातावरण दूषित करणाऱ्या या जुगाराच्या अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आता स्वतः लक्ष घालून विशेष पथकामार्फत धडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी होत आहे. तसेच, वारंवार तक्रारी आणि वृत्त प्रसिद्ध होऊनही दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार का, याकडे संपूर्ण सातारा शहराचे लक्ष लागले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

शाळेच्या उंबरठ्यावर जुगाराचा बाजार सुरूच; शाहूपुरी पोलिसांचे 'अर्थपूर्ण' मौन की 'राजा'श्रयापुढे प्रशासन हतबल?

शाळेच्या उंबरठ्यावर जुगाराचा बाजार सुरूच; शाहूपुरी पोलिसांचे 'अर्थपूर्ण' मौन की 'राजा'श्रयापुढे प्रशासन हतबल?

 पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?

पुसेसावळीतील अवैध धंद्यांवर पोलिस कारवाईची धार हवी; केवळ धाडी पुरेशा की मुळावर घाव गरजेचा?

शामगांव घाट ते गोपूज रस्त्याची दयनीय अवस्था; रस्त्याची डागडुजी तर दूरच, साधे खड्डे बुजविण्याचीही प्रशासनाला उसंत नाही का?

शामगांव घाट ते गोपूज रस्त्याची दयनीय अवस्था; रस्त्याची डागडुजी तर दूरच, साधे खड्डे बुजविण्याचीही प्रशासनाला उसंत नाही का?

शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका

शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका

शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?

शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?

मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला