चोराडे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जिवदान.
आशपाक बागवान.
- Thu 5th Nov 2026 02:02 pm
- बातमी शेयर करा
पुसेसावळी : वनपरिक्षेत्र वडूज अंतर्गत येणार्या वन परिमंडळ वडूज मधील मौजे चोराडे ता. खटाव येथे दूरध्वनीवरून मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा १० ते ११ वाजता वन्यप्राणी कोल्हा हा विहिरीत पडलेला असल्याचे समजताच तात्काळ परिमंडळ वडूज मधील वनविभागाचे कर्मचारी व बचाव दल सदस्य यांनी जागेवर पोहोचत सदर विहिरीची पाहणी करून बचाव कार्य सुरू केले.
या वर्षी पाऊसकाळ कमी असल्यामुळे आधीच पाणी पातळी खालावलेली असल्याने सदर विहीरीत ३० ते ४० फुट पाणी खाली असून देखील वनविभागाने सदरची जोखीम पत्करून सदर कोल्हा हा वन्यप्राणी सुखरूप बाहेर काढून सुस्थितीत असलेची खात्री करून नैसर्गिक अधिवासात निसर्ग मुक्त करण्यात आले. मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांचा आलेख पाहता. वनविभागाशी नागरिकांनी संपर्क साधला असता तात्काळ बचाव कार्य पूर्ण केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सदर बचाव कार्य हे श्री. अमोल सातपुते,(भा.व. से), उपवनसंरक्षक वन विभाग सातारा, श्री. दिगंबर जाधव, सहायक वनसंरक्षक ( रो.ह.यो ) सातारा, श्री.नितीन आटपाडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) वडूज, यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल देशमुख वनपाल वडूज, सलीम तांबोळी वनरक्षक पुसेसावळी, निखिल कदम वनरक्षक वडूज, श्रीमती. जयश्री सकट वनरक्षक कातरखटाव, वनसेवक महेश पाटोळे, तुषार जगताप, ओंकार माळवे, प्रविण जाधव तसेच मौजे चोराडे येथील शेतकरी संतोष एकनाथ साळुंखे,
अमोल साळुंखे,सुरज पिसाळ,कृष्णात मदने,संतोष कोळेकर,अभिजित पिसाळ,तानाजी पिसाळ,तुषार साळुंखे,नारायण पिसाळ ,बाबासाहेब पिसाळ यांनी विशेष योगदान दिले.
#पुसेसावळी
स्थानिक बातम्या
चोराडे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जिवदान.
- Thu 5th Nov 2026 02:02 pm
वर्दीतील दर्दी! कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करणारे पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर.
- Thu 5th Nov 2026 02:02 pm
मसूर पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली?
- Thu 5th Nov 2026 02:02 pm
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Thu 5th Nov 2026 02:02 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Thu 5th Nov 2026 02:02 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Thu 5th Nov 2026 02:02 pm
संबंधित बातम्या
-
वर्दीतील दर्दी! कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करणारे पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर.
- Thu 5th Nov 2026 02:02 pm
-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेबेवाडीत राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
- Thu 5th Nov 2026 02:02 pm
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Thu 5th Nov 2026 02:02 pm
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Thu 5th Nov 2026 02:02 pm
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Thu 5th Nov 2026 02:02 pm









