वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना राजमाता भेटल्या
Satara News Team
- Fri 16th Jun 2023 11:47 am
- बातमी शेयर करा
सातारा : गेला काही दिवसापासून पोवई नाक्यावरील आयर्लंड बाबत साताऱ्यात वाद-विवाद सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी पंकज चव्हाण हे उपस्थित होते यावेळी पवई नाक्यावर शिवतीर्थाव्यतिरिक्त कोणतेही आयर्लंड नको आहे आणि असं काही झाल्यास सातारमध्ये मोठा जनक्षोभ उसळेल असंही राजमाता यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. यावर मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी मी स्वतः या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून घेतो पोवईनाक्यावरील निर्णय हा शिवप्रेमींच्या भावना विचारात घेऊनच होईल आपण निश्चित रहा अशी ग्वाही त्यांनी दिली.
विकसित करण्याबाबत पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठकही झाली आहे. हा चौक नेमका कुठे असेल? याबाबत अद्यापही कोणत्याच यंत्रणेकडून स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, हा विषय अजेंड्यावर आल्यावर सोशल मीडियातून जोरात कालवाकालव सुरू झाली. त्यानंतर सोशल मीडियातील प्रतिक्रियांची दखल माध्यमांनीही घेतली. त्यातच सामाजिक संघटना आक्रमक झाल्या. दस्तुरखुद्द राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले या शिवतीर्थावर गेल्या. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला तर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी फेसबुकवरून आवाज टाकत सातारकरांच्या अस्मितेवर घाला सहन करणार नाही, असा सज्जड इशारा दिला. पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्यातर्फे जयवंत शेलार यांनी त्यांच्या सहीचे पत्रक काढले. त्यात पोवई नाक्यावर शिवतीर्थ वगळून अन्य जागी बाळासाहेब देसाई यांचे स्मारक करणार असल्याचे म्हटले आहे. शिवतीर्थाचे कोणतेही नामांतर केले जाणार नसल्याचेही पालकमंत्र्यांच्या नावे काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पोवई नाक्यावरचा हा वाद पेटला असतानाच गुरूवारी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी मुंबईत जावून वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. ऐतिहासिक पोवई नाक्याचे महत्व त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. छत्रपती शिवाजी |महाराजांचा कुठेच नाही असा पुतळा पोवई नाक्यावर शिवाजी सर्कल येथे आहे. अलीकडे या भूमीला शिवप्रेमींनी शिवतीर्थ हे नाव दिले आहे. याच परिसरात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी त्यांचे आजोबा स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावाने स्मारक उभे करण्याचा, चौक सुशोभित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सातारकरांनी तीव्र विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व छत्रपती घराण्यातील कर्तृत्ववान राजांच्याव्यतिरिक्त त्या परिसरात कोणाचेही पुतळे व स्मारक उभे होवू देणार नाही. तसा प्रयत्न झाला तर जनक्षोभ उसळेल, अशी माहिती राजमातांनी मुख्यमंत्र्यांना दिली. शिवप्रेमी व सामाजिक संघटना या विषयात आक्रमक असल्याचे राजमातांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. लोकभावनेचा विचार आपण केला पाहिजे, असेही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे राजमाता म्हणाल्या. शिवप्रेमींची भावना व लोकभावना विचारात घेवून पोवई नाक्यावरील निर्णय होईल. या संदर्भात आपण स्वतः सर्व संबधितांशी बोलू, असे मुख्यमंत्र्यांनी आपणाला सांगितल्याचे राजमातांनी सांगितले. यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे समर्थक पंकज चव्हाण हेही उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 16th Jun 2023 11:47 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 16th Jun 2023 11:47 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 16th Jun 2023 11:47 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 16th Jun 2023 11:47 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 16th Jun 2023 11:47 am
संबंधित बातम्या
-
हातगेवर विकास सेवा सोसायटीत कर्जप्रकरणी फसवणुकीचा आरोप; सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा यांच्याकडे तक्रार दाखल
- Fri 16th Jun 2023 11:47 am
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Fri 16th Jun 2023 11:47 am
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Fri 16th Jun 2023 11:47 am
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 16th Jun 2023 11:47 am
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Fri 16th Jun 2023 11:47 am












