कास परिसरातील आटाळी येथे गव्याच्या झुंडीने लाखो रुपयांचे केले नुकसान

बंदोबस्त करण्याची मागणी

कास  : सातारा कास मार्गावरील आटाळी गावच्या हद्दीतील भात शेतीचे अतोनात नुकसान रानगव्याच्या कळपाने केले असून या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची मागणी करून वनविभागाने तातडीने रानगव्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. 
     याबाबत सविस्तरवृत्त असे सातारा जावली तालुक्याच्या सरहद्दीवरील आटाळी ता.सातारा या गावातील खरे भातशेती हे उत्पन्न असल्याने दरवर्षी प्रमाणे या वर्षीची मोठ्या प्रमाणात भातशेतीची शेकडो एकर क्षेत्रात लागन करण्यात आली होती. सुरवातीच्या काळात रानगव्याच्या कळपाने त्या शेतीचे नुकसान केले. त्यानंतर शेतकर्‍यांनी पुन्हा भातरोप आणून लागण केली असता थोडीफार पावसाची उघडीप मिळाल्यास येथील शेतकऱ्यांनी भांगलन करून शेती तजेलदार केली असता काल दि.23 रोजी डोंगरदऱ्यातुन आलेल्या रानगव्याच्या झुंडीच्याझुंडी शेतकर्‍यांच्या शेतीत घुसून लाखो रूपयांची भात लागण केलेली शेतीचे नुकसान केले. 
   यामध्ये सुरेखा माने, धोंडीराम आटाळे,नारायण मोरे, रामचंद्र मोरे, चेतन आटाळे,नारायण आटाळे,राजाराम अहिरे, संतोष आटाळे, चंद्रकांत अहिरे, गणपत आटाळे,जोतीराम अहिरे, संतोष अहिरे या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. 
      यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीस सरपंच  सोमनाथ आटाळे म्हणाले की डोंगर कपारीत भातशेती व्यतिरिक्त कोणतेही पिकांचे उत्पादन होत नसून भातपीक हेच येथील सर्वसामान्य लोकांच्या जीविकोपार्जन होत असून गतवर्षी रानगव्याच्या कळपाने दोन वेळा नुकसान केले असून संबधित यंत्रणेनेच या शेतीचे पंचनामे करून तातडीने भरपाईची मागणी सरपंच  सोमनाथ आटाळे यांनी केली आहे 

 

 पिसाणी, देवकल, कास पासुन ते बामणोली पर्यंत सर्वच डोंगरदऱ्यातील लोकांच्या भातपीक या मुख्य पिकांची गेले कित्येक वर्ष रानगव्याच्या उपद्रवी कारणाने या परिसरातील लोकांनी शेती करणे बंद केले असून आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी रस्त्याच्याकडेला छोटे व्यावसायिक या ठिकाणी आपले पारिवारिक उदरनिर्वाहासाठी झटत असतात एकीकडून शेतीचे नुकसान होते म्हणून व्यवसायात जम बसविण्यासाठी लोक धडपडत असतात तर त्यानाही शासना कडून धाकदडपशाही नोटीसा देण्याचे काम करीत असून सत्य परिस्थितीला सामोरे जावून शासनाने तातडीने स्थानिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी...
                  सोमनाथ जाधव 
    कासपठार वन समिती माजी अध्यक्ष 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त