महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या सौ.प्रतिभाताई शेलार यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान

महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ. प्रतिभाताई शेलार यांना सामाजिक कार्यात अग्रेसर राहून महिलांचे व समाजातील विविध घटकांचे प्रश्न मार्गी लावण्याबद्दल त्यांना मातृछाया फाउंडेशनच्या वतीने नारीशक्ती पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले व त्यांच्या कार्याची प्रशंसा मातृछाया जनसेवा फाउंडेशन चे संस्थापक जयंत अहिरे व संस्थापिका राजनंदिनी अहिरे यांनी केली. मातृछाया फाउंडेशन चे संस्थापक जयंत अहिरे व संस्थापिका राज नंदिनी अहिरे यांनी महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभाताई शेलार यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित केले त्यांचे कार्य हे समाजामध्ये अग्रेसरी असतेच तसेच समाजातील महिला, मुली यांच्यावर होणारे अत्याचार व शोषण या विरोधात न्याय व हक्क मिळवून देतात

तसेच लहान मुलांवर होणारे अत्याचार व शोषण होणारे यावरही ते न्याय व हक्क मिळवून देण्याचे कार्य करत असतात  तसेच वृद्ध व्यक्तींवर होणारे घरगुती अत्याचारां विरोधात त्यांची लढाई ही चालूच असते त्याचप्रमाणे महालक्ष्मी आधार फाउंडेशन मार्फत ते ब्युटी पार्लर टेलरिंगची क्लासेस व केकचे क्लासेस हे मोफत महिला व मुलींना देत असतात तसेच अंगणवाडीतील लहान मुलांसाठी पोषण आहाराचे कार्यक्रम ही करत असतात त्या कार्यक्रमांमध्ये फळ खाऊ वाटप करणे हेही कार्य त्यांची चालूच असते तसेच प्रतिभाताई शेलार या महालक्ष्मी न्यूजच्या संपादिका आहेत या न्यूज चैनल मार्फत ते लोकांचे प्रश्न प्रतिनिधी म्हणून प्रशासनाकडे मांडत असतात अशा प्रकारे त्यांचे कार्य हे चालूच असते तसेच त्या प्रत्येक सरकारी कर्मचारी मंत्री आमदार खासदार जिल्हाधिकारी तहसीलदार व इतर अशा व्यक्तींना भारताची संविधान भेट देऊन त्यांचा सन्मान करत असतात तसेच त्यांच्या संस्थेचे नाव महालक्ष्मी आधार फाउंडेशन आहे त्यांच्या संस्थेचे प्रतीक हे महालक्ष्मी देवी आहे त्यामुळे त्या महालक्ष्मी देवीची प्रतिमाही भेट देत असतात अशी त्यांची जनजागृती व न्याय व हक्काची लढाई चालूच असते.


आज पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे मातृछाया जनसेवा फाउंडेशन पुरस्कार सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये त्यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला मातृछाया जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक जयंत अहिरे व संस्थापिका राजनंदिनी अहिरे तसेच कार्यक्रमांमध्ये इतर मान्यवर ही उपस्थित होते व पदक अधिकारी उपस्थित होते

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त