सातारा शहर पोलीस ठाण्याअंतर्गत तब्बल ९६ जणांना केले हद्दपार

सातारा  : पोलीस अधिक्षक सो, सातारा श्री समीर शेख तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक सो, सातारा श्रीमती डॉ.वैशाली कडुकर यांनी दिनांक ०७/०९/२०२४ ते १८/०९/२०२४ रोजीपर्यत साजारा होणारा गणेशोत्सव निर्भयपणे पार पाडणेकरीता सराईत गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

 

यानुसार गणेशउत्सव निर्भयपणे पार पाडण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ.वैशाली कडूकर यांनी दिलेल्या आदेशानुसार 2024 कालावधीत अवैद्य व्यवसाय करणारे व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असणारे तब्बल 96 सराईत गुन्हेगारांना सातारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मिरवणुकीमध्ये वावर करू नये परिसरात थांबू नये किंवा कोणत्याही गंभीर स्वरूपाचा गुन्हा यांच्याकडून घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये यासाठी मा.कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार, सातारा तालुका याचे कडील आदेश क्र. एमएजी/कावि- १६९६/२०२४ दि.०६/०९/२०२४ चे आदेशान्वये सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील एकुण ९७ सराईत गुन्हेगारावर बी.एन.एस.एस. कलम १६३ अन्वये दिनांक ०७/०९/२०२४ रोजीचे ००.०० ते दि. १८/०९/२०२४ रोजीचे २४.०० वाजेपर्यत सातारा जिल्हा हद्दीतुन हद्दपार करण्यात आले आहे.

 

सदरची उत्कृष्ट कामगिरी सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व पोलीस निरीक्षक गुन्हे सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार दीपक इंगवले, संदीप पवार व पोलीस शिपाई रोहित जाधव, अमोल सापते यांनी केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला