कुमठे गावच्या सरपंचाचा पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न सरपंचावर गुन्हा दाखल

कोरेगाव : पत्नीला लॉजमध्ये नेवून सरपंच पतीने तोंडावर उशी ठेवून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सरपंच संतोष चव्हाण यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सासूनेही दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 


 पती संतोष गुलाब चव्हाण, सासू कलावती गुलाब चव्हाण (दोघे रा. कुमठे ता. कोरेगाव) यांच्याविरुध्द मयुरी रमेश कांबळे (वय 30, रा. कुमठे ता.कोरेगाव सध्या रा.रविवार पेठ, वाई) यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान संतोष चव्हाण हे कुमठे गावचे सरपंच आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खुनाच्या प्रयत्नाची घटना एप्रिल 2025 मध्ये सातार्‍यातील एका लॉजमध्ये घडली आहे. 


सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात असलेल्या लॉजमध्ये तक्रारदार पत्नी व पती थांबले होते. त्यावेळी पतीने पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली. या वादावादीनंतर पतीने पत्नी झोपली असताना तोंडावर उशी दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, संतोष चव्हाण हे कुमठेचे लोकनियुक्त सरपंच आहेत. सरपंच पदावर असताना चव्हाण यांनी स्त्री सन्मानाचा अपमान करत गंभीर गुन्हा केला आहे. यामुळे पीडित महिला असलेल्या त्यांच्या पत्नीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे संतोष चव्हाण यांना सरपंचपदावरून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला