मुलाचा वडिलांवर डोक्यात दगड घालून तलवारीने हल्ला
Satara News Team
- Mon 7th Jul 2025 10:26 am
- बातमी शेयर करा

कराड : बैल व्यवस्थित सांभाळता येत नाही असे म्हणत मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घालत तसेच तलवारीने वार करत खुनी हल्ला केल्याची घटना हजारमाची (ता. कराड) येथे घडली. याप्रकरणी रविवारी सायंकाळी कराड शहर पोलिस ठाण्यात जखमी संजय दिनकर शिंदे (वय 56) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी संशयित मुलगा आकाश शिंदे (24) याला ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची गावच्या हद्दीत मळा वॉर्डमध्ये गावठी ढाब्याच्या पाठीमागे संजय शिंदे हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. संशयित आकाश शिंदे याने तुम्हाला बैल व्यवस्थित सांभाळता येत नाही, असे म्हणून वडील संजय शिंदे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर चिडून आकाश याने डोक्यात दगड घालून वडिलांना जखमी केले. नंतर त्याने संजय यांच्या गळ्यावर तलवारीने वार केला. सुदैवाने संजय शिंदे तो चुकविल्याने हा वार गळ्याऐवजी त्यांच्या कानावर बसला. यात संजय शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Mon 7th Jul 2025 10:26 am
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Mon 7th Jul 2025 10:26 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Mon 7th Jul 2025 10:26 am
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Mon 7th Jul 2025 10:26 am
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Mon 7th Jul 2025 10:26 am
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Mon 7th Jul 2025 10:26 am
संबंधित बातम्या
-
कुमठे गावच्या सरपंचाचा पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न सरपंचावर गुन्हा दाखल
- Mon 7th Jul 2025 10:26 am
-
कराड तालुक्यात राजकीय चर्चेवेळी युवकावर कोयत्याने वार
- Mon 7th Jul 2025 10:26 am
-
खूनप्रकरणातील विवाहितेच्या भावांवर गुन्हा दाखल
- Mon 7th Jul 2025 10:26 am
-
अंजलीचा खुनाचा संशयित पती शुद्धीवर, विवाहितेच्या मृत्यूचे गूढ आज उलगडणार ?
- Mon 7th Jul 2025 10:26 am
-
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करुन मृतदेह कॉटच्या खाली झाकला कपड्याच्या गाठोड्यांनी
- Mon 7th Jul 2025 10:26 am
-
अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्यास मारहान केलेल्या नराधमाच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या
- Mon 7th Jul 2025 10:26 am
-
माणमध्ये परमिट रूम मध्येही देशी दारूचा ‘सुळसुळाट’
- Mon 7th Jul 2025 10:26 am
-
प्रेमप्रकरणातून अपहरण झालेल्याची सुटका
- Mon 7th Jul 2025 10:26 am