आम्ही केलेलं काम जितेंद्र आव्हाड यांना बघवत नाही.
लोकांच्या भावना भडकवण्याचे काम अमोल मिटकरी करत आहेत.मंत्री शंभूराज देसाईSatara News Team
- Sat 3rd Jun 2023 08:00 am
- बातमी शेयर करा
सातारा :- रायगड येथे शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.आमच्या सरकारने जे चांगलं केलंय त्यापासून लोकांचं लक्ष विचलित करायचं केविलवाना प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत.. आम्ही केलेल काम हे त्यांना बघवत नसल्याचा टोला शंभूराज देसाई यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावत महाविकास आघाडीतील लोकांना कामच राहिले नाही..
उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभे होते हे वाहिन्यांवरती दिसत होतं.ट्विट करून लोकांच्या भावना भडकवण्याचे काम अमोल मिटकरी करत आहेत.चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता गांभीर्याने बघत नसल्याचा सांगत अमोल मिटकरी यांच्या समाचार मंत्री देसाई यांनी घेतला आहे.
महाविकास आघाडीने लोकसभा-विधानसभा निवडणुका आमच्या युती समोर लढणार आणि बहुमत मिळवणार हे सांगण हास्यास्पद - शंभूराज देसाई
महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत राहणार का? टिकणार का? एकत्र तीघेजण निवडणूका लढवणार का? याच्यावर त्यांचं पहिलं एक मत होऊ द्या मग, त्यांचं जागा वाटप आणि कुठली जागा कोणाला हे ठरू द्या.. महाविकास आघाडीने वज्रमुठ सभा घेतल्या..कोण वक्ता बोलताना पोडियम मध्ये पाहिजे यामध्ये वाद असून कोणाची खुर्ची मोठी कोणाची खुर्ची छोटी यावरून वाद चालू आहेत.. त्यांनी आमच्या युती समोर लढणार आणि बहुमत मिळवणार हे सांगण हास्यास्पद असल्याचे सांगत महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय..
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 3rd Jun 2023 08:00 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 3rd Jun 2023 08:00 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 3rd Jun 2023 08:00 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sat 3rd Jun 2023 08:00 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 3rd Jun 2023 08:00 am
संबंधित बातम्या
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Sat 3rd Jun 2023 08:00 am
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Sat 3rd Jun 2023 08:00 am
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 3rd Jun 2023 08:00 am
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Sat 3rd Jun 2023 08:00 am












