चाळकेवाडी येथे राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते साडी वाटप

राजमातांकडून गावातील महिलांची आस्थेने विचारपूस

सातारा  : चाळकेवाडी तालुका सातारा येथील गावातील गरजू महिलांना राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते 300 हून अधिक साड्यांचे वाटप करण्यात आले जलमंदिर हे सर्वसामान्यांसाठी नेहमीच खुले आहे असे आश्वासन राजमातांनी दिले यावेळी मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष रंजना रावत, गीतांजली कदम, अश्विनी पुजारी रणजित घोरपडे वन विभागाचे अधिकारी तसेच गावातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते

 चाळकेवाडी परिसरातील महिलांचे प्रश्न सोडवण्याचा निर्णय राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी केला होता त्यानुसार राजमातांच्या वतीने येतील एका कार्यक्रमात त्यांच्या हस्ते महिलांना सहावार आणि नऊवार साडी वाटप करण्यात आले . यावेळी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांची राजमाता कल्पनाराजे यांनी अत्यंत आस्थेने चौकशी केली 

 

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या जलमंदिर हे सर्वसामान्य जनतेचे आहे . ते कायमच सर्वांसाठी खुले आहे आपले काही प्रश्न असल्यास आपण निश्चितच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संपर्क करू शकता . चाळकेवाडी हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील क्षेत्रात येते . यामुळे येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचे प्रश्न आहेत त्यांना खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे जागा मिळालेली आहे . मात्र पुनर्वसनाच्या काही तांत्रिक त्रुटी आणि सोपस्कार बाकी असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही यासंदर्भात राज्य शासन तसेच केंद्र शासन यांच्याशी स्वतः संपर्क साधून आपण पाठपुरावा करू तसेच येथील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरू असे आश्वासन राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी दिले या महिलांना बचत गट चळवळीमध्ये सामावून घेणे आणि त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावणे या माध्यमातून कार्यक्रम आखण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त