गुन्हेगारांचा कर्दनकाळ, सर्वसामान्यांचा आधार.... पोलीस निरीक्षक निलेश तांबे
Satara News Team
- Sat 24th Aug 2024 01:27 pm
- बातमी शेयर करा

सातारा : पोलीस अधिकारी म्हटलं की, करारी चेहरा,बोलण्यात जरबता आलीच.अनेक पोलीस अधिकारी आक्रमक, शांत, मितभाषी, अशा स्वभावाचे अनेकांना दिसतात, परंतु आपण अशाच एका अष्टपैलू व शिस्तप्रिय कर्तृत्ववान व सर्व सामान्य जनतेच्या मनात घर केलेल्या पोलीस निरीक्षक श्री.निलेश तांबे यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ...
अल्प परीचय
पोलीस निरीक्षक श्री.निलेश तांबे यांचा जन्म आई सौ. सुमन तांबे वडील श्री.बबनराव तांबे या दाम्पत्याच्या पोटी काष्टी,श्रीगोंदा येथे झाला,आई वडीलांनी मुलाच्या शिक्षणासाठी खुप कष्ट घेतले.त्या कष्टाचे मोल म्हणून लहानपणापासून आपले स्वप्न सत्यात उतरायचे ही जिद्द निलेश यांच्यात ठासून भरली होती.यशाची नवनवी क्षितीजे पादाक्रांत करणाऱ्यानां खाचगळग्यातून वाट काढावी लागते हे सर्वांना माहीत आहे. सर्वं सामान्य कुटुंबातील अधिकारी श्री.निलेश तांबे,आज रोजी सातारा जिल्ह्यातील सातारा तालुका पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत.पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक पदावर निष्कलंक व कोणत्याही वादविवादात न अडकता आपले कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत.या सर्वं प्रवासात आई वडील, पत्नी, व कुटुंबाचा त्याग आहे हे नक्की..
शिक्षण प्रवास
श्री.निलेश तांबे यांचे प्राथमिक शिक्षण -जिल्हा परिषद शेटफळगडे,तालुका इंदापूर,जिल्हा पुणे.येथे झाले तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालय, शेटफळगडे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. याठिकाणी झाले. लहानपणापासून शाळेची आवड व त्यातल्या त्यात शेतीची आवड असल्याने कृषी पदवीधर होण्यात त्यांची रूची होती, कृषी पदवीधर अधिकारी म्हणून शिक्षण - बीएससी ऍग्री, दापोली विद्यापीठ येथे घेतले. प्रयत्न प्रामाणिक असतील तर यश मिळवण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही.हा संदेश श्री.निलेश तांबे यांनी लहानपणापासून आत्मसात केला..
महाराष्ट्र पोलीस दलात रूजू...
लहानपणापासून आपले ध्येय पुर्णत्वास मिळालेल्या निलेश यांना आता खाकी वर्दीचे आकर्षक वाटू लागले. त्यांनी त्या दिशेने तशी वाटचाल देखील सूरू केली.आई वडीलांनी अपार कष्ट करून शिकवण्यासाठी खुप प्रयत्न केले.त्याचे सार्थक मी करणार अशीच जिद्द मनी बाळगली व पोलीस दलात 01 सप्टेंबर 2009 रोजी दाखल झाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन निकालाचा दिवस आला निलेश यांचा आनंद गगनात मावेनासा झाला यावेळी कुटुंबाच्या चेहऱ्यावरील आनंद सार काही जात होता...
खाकी वर्दीतील विशेष सन्मान..
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य घेऊन आपले प्रशिक्षण पुर्ण करून पोलीस दलात श्री.निलेश तांबे यांनी पाऊल टाकले, व आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवून दिली.. नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरी केल्याबद्दल माननीय पोलीस महासंचालक यांच्याकडून विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले...
देवरी, जिल्हा गोंदिया या नक्षलग्रस्त भागामध्ये आदिवासी मुला मुलींचे विनामूल्य निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल प्रशस्तीपत्र मिळालेले आहे.
आज अखेर पोलीस विभागातील सेवेमध्ये एकूण 100 च्या आसपास बक्षीसे मिळालेले आहेत. यामध्ये नवी मुंबईतील उरण पोलीस स्टेशन येथे डिटेक्शन ऑफिसर आणि गुन्हे शाखा नवी मुंबई येथे कार्यरत असताना उल्लेखनीय कामगिरी.केल्याची नोंद आहे..
पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना बरोबर घेऊन त्यांनी आपल्या अभ्यासू, शांत, संयमी व शिस्त प्रिय आणि न्यायीक स्वभावातून येथील जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी लिलया पेलली. जनसंपर्क व सुसंवादातून कायदा, शांतता व सुव्यवस्थेची प्रकरणे हाताळून काही गुन्हे उघडकीस आणत अनेक आरोपींना कारागृहाची वाट दाखविली आणि पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
सातारा तालुका पोलीस स्टेशनचा पदभार घेतल्यापासून सातत्यपूर्ण कामगिरी.
सातारा तालुका पोलीस स्टेशनचा पदभार घेतल्यापासून श्री.तांबे हे आपल्या स्वभावामुळे नावारूपास येत आहेत पदाचा भाव न ठेवता आपण देखील सर्वं सामान्य व शेतकरी कुटुंबातील आहोत याचे भान ठेवत पाय जमिनीवर असल्याचे दिसून येत आहे.व घडलेले गुन्हे उघडकीस आणून कायदा सुव्यवस्था अबाधित राखतांना दिसत आहेत..
ट्रकने उडवले, पोलीसांनी अथक प्रयत्न करून आरोपीला शोधले..
सातारा तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी चालकास आयशर ट्रकने धडक देऊन पुण्याच्या दिशेने पळून गेला होता त्यामध्ये दुचाकी चालक मयत झाला, सदरचा ट्रक व चालकास 8 तासाच्या आतमध्ये अटक केली...
बलात्कार करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या
10/05/2024 रोजी वाढे गावच्या हद्दीत सदर गुन्हयातील फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवुन बलत्कार केला. सदर गुन्हयातील पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेऊन शिक्रापुर पोलीस ठाणे येथे ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
खूनाचा गुन्हा उघडकीस
दिनांक 12/,06/2024 रोजी सातारा तालुक्यातील पाटखळ गावात सदर गुन्हा मयत फिर्यादीच्या मुलाच्या लग्नात झालेल्या वादातुन फिर्यादीच्या मुलाचा मित्र याने मनात राग ठेऊन पेट्रोल ओतुन पेटवून देऊन खुन केला व पळून गेले होते. सदर गुन्हयातील पाहिजे असले आरोपींना ४ तासाच्या आतमध्ये अटक केली व गुन्हा उघडकीस आणला
चोरीचा गुन्हा उघडकीस
दिनांक 21/06/2024 रोजी वडुथ येथे राहत्या घरी
एका संशयित महिलेस मौजे कळंबे ता. जि. सातारा येथुन ताब्यात घेऊन तिच्याकडे कसोशीने चौकशी केली असता चौकशी दरम्यान सदर महिला ही तक्रारदार हिची नातेवाईक असुन तिने तक्रारदार यांच्या घरातुन सदर सोने व चांदी चोरुन घेऊन गेल्याची कबुली दिली. तसेच तिच्याकडुन 6 तोळे सोने व चांदिचे दागिने ताब्यात घेऊन सदर गुन्हयामधील महिलेस अटक केली आहे..
खूनाचा गुन्हा लगेच उघडकीस..26/06/2024 रोजी मर्डर घटना- केळवली येथे सदर गुन्हा हा आरोपी पैशाच्या वादातुन मनात राग ठेऊन शिवीगाळ करत होता म्हणुन ठासनीचे रायफल ने फायरींग करुन फिर्यादीचा भाऊ याचा खुन केला आहे सदर गुन्हयातील पाहिजे असले आरोपींना 12 तासाच्या आतमध्ये अटक केली आहे...
अपघात झाला तात्काळ मदत
01/08/2024 मौजे पेट्री येथे सायंकाळी 6 वाजता खोल दरीत महिंद्रा स्कॉर्पिओ ही गाडी कोसळून अपघात झाला होता. सदर गाडीमधील 7 इसमानां पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदार यांनी रात्रभर पावसामध्ये अथक प्रयत्न करुन पहाटे 5 वाजेपर्यंत दरीतुन मा.श्री.छ. शिवेंद्रराजे भोसले रेसक्यु टिम च्या मदतीने बाहेर काढुन जखमीस हॉस्पिटलला उपचारकामी दाखल करणेत आले..
महिला दरीत पडली
दिनांक 03 /08/2024 रोजी सदर घटनेतील महिला ही लघुशंकेकरिता बोरणे घाट येथे झुडपात गेली असता तिचा पाय घसरुन खोल दरीत पडली होती. तिला पोलीस पथक, संयुक्त वन व्यवस्थापन समिती व होमगार्ड यांनी तिला खोल दरीतुन 1 तासाच्या आतमध्ये सुखरुपरित्या बाहेर काढुन हॉस्पिटलला उपचारकामी दाखल केले.व जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले..
दोन वर्षाची मुलगी २४ वर्षाची तिची आई मिसिंग दाखल झाले होते...
सदर मिसींग मधील दोन वर्षाची मुलगी व तिची आई मिसींग नोंद असुन सदर मिसींग शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करुन सदर मिसींग मुलगी व तिची आई हीने कृष्णा नदीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले होते. पोलीस व महाबळेश्वर ट्रेकर्स यांनी सलग आठ दिवस बोटीच्या सहाय्याने अथक परिश्रम घेऊन त्यांचा शोध घेऊन सदर दोन्ही मयत नातेवाईकाच्या ताब्यात पीएम करुन अंत्यविधीकरिता देण्यात आले.
हळव्या स्वभावाचा पोलीस अधिकारी..
साधी राहणी, उच्च विचारसरणी म्हणजे निलेश तांबे. गावातल्या उक्ती प्रमाणेच व्यक्ती तेव्हा मोठा होतो,जेव्हा माणूस म्हणून मोठा होतो, मानसाने माणसांशी मानसा समान वागणे हेच ब्रीदवाक्य जोपासत आहेत.कायद्याची बुज सर्वांनी राखावी एवढीच माफक अपेक्षा बाळगून कर्तव्य बजावताना कसलीही तक्रार घेऊन आलेला व्यक्ती आजपर्यंत कधीही हातास, निराश होऊन परत जात नाही.सर्व सामान्य माणसाला मदत मिळण्यासाठी नेहमी प्रयत्न करणे हाच हेतू सातारा तालुका पोलीस स्टेशन करत आहे..
सातारा तालुका पोलीस स्टेशन श्री.निलेश तांबे यांनी केले चार्ज
प्रभारी अधिकारी म्हटल्यावर थोडा ताण असतोच तरी देखील डोक्यावर बर्फ तोंडात साखर ठेवून संयम सहनशीलता व संतुलन न हलता पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला सहकारी वर्ग सामाजिक संस्था राजकारणी नेते यांच्यासोबत अतिशय शांत पणे बोलत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत स्वतः कधीही कौतुक न करता आपले कर्तव्य बजावत सर्वांच्याच मनात आपले आदराचे स्थान निर्माण केले आहे.वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.निलेश तांबे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संदीप पोमण ,श्री.काटकर पोलीस उपनिरीक्षक सोनु शिंदे व दप्तरी, गोपनिय, अपघात विभाग, बीट अंमलदार यांनी परिश्रम घेतले आहेत ...
स्थानिक बातम्या
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sat 24th Aug 2024 01:27 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sat 24th Aug 2024 01:27 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sat 24th Aug 2024 01:27 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sat 24th Aug 2024 01:27 pm
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Sat 24th Aug 2024 01:27 pm
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Sat 24th Aug 2024 01:27 pm
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Sat 24th Aug 2024 01:27 pm
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Sat 24th Aug 2024 01:27 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Sat 24th Aug 2024 01:27 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Sat 24th Aug 2024 01:27 pm
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Sat 24th Aug 2024 01:27 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Sat 24th Aug 2024 01:27 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Sat 24th Aug 2024 01:27 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Sat 24th Aug 2024 01:27 pm