वाई तालुक्यात समाधानकारक पावसाने पेरण्यांचा वेग वाढणार

दुबार पेरणीचे संकट टाळल्याने शेतक-यांच्यात समाधान
आत्तापर्यंत झालेला पाऊस हा उन्हाळी पाऊस असल्याने जिथे पडेल तिथेच तो पडत होता तर बाकी क्षेत्रावर पाऊस न झाल्याने पेरणी करणे म्हणजे नाशिबावर हवाला ठेवल्यासारखे होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल होवून पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत होता

सातारा न्यूज  ; वाई/ दिनांक ४ रोजी दिवसभर झालेल्या पावसाने वाई तालुक्यातील शेतक-यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यात सध्या सोयाबीन पिकांची पेरणी सुरु आहे. मात्र पेरणीबाबत शेतकरी वर्गामध्ये द्विधावस्था झाली होती. पुरेशा पाऊस झाला नव्हता त्यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रावर दुबार पेरणीची टांगती तलवार होती तर वेळे, कवठे, सुरूर व बोपेगाव या पट्ट्यातील पूर्वेकडील डोंगररांगाच्या परिसरातील शेती हि दुष्काळी पट्ट्यात मोडत असल्याने या परिसरातील शेतक-यांची पेरणी अद्याप झाली नव्हती. आज मात्र झालेला पाऊस हा समाधानकारक पडल्याने या परिसरातील शेतक-यांच्यात समाधानाचे वातावरण असून वापसा आल्यानंतर पेरणीसाठीची तयारी शेतक-यांच्यात झाली असून ज्या शेतक-यांनी पावसावर हवाला देवून पेरणी केली होती त्या शेतक=यांच्या पिकाला जीवदान मिळाल्याने या परिसरातील शेतकरी आजच्या पावसाने आनंदी झाला आहे. 
            वास्तविकत: जूनच्या पहिल्या आठवड्यात या परिसरातील पेरण्यांना वेग येतो व बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील पेरण्या उरकल्या जातात परंतु यंदा पावसाने नाममात्र दर्शन झाल्याने जमिनीत पाहिजे असा ओलावा निर्माण झाला नव्हता. आत्तापर्यंत झालेला पाऊस हा उन्हाळी पाऊस असल्याने जिथे पडेल तिथेच तो पडत होता तर बाकी क्षेत्रावर पाऊस न झाल्याने पेरणी करणे म्हणजे नाशिबावर हवाला ठेवल्यासारखे होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल होवून पेरणीयोग्य पावसाची वाट पाहत होता. दर दहा वर्षाने येणा-या अवर्षण कालावधीचे २०२२ हे साल असल्याने यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार कि नाही ? या विचाराने शेतक-यांच्या मनात पावसाबाबत धास्ती घेतली होती व नांगरट, मशागत तसेच बियाण्याचे व खतांचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी वर्गात पेरणीबाबत चिंता होती . अत्यल्प ओलीवर पेरणी केल्यास व पुन्हा पाऊस पडला नाहीतर शेतक-यांच्या कष्टावर पाणी फिरणार असल्याने धास्तावलेला शेतकरी चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून होता. मात्र आजच्या झालेल्या पावसाने या परिसरात पेरणी वेग घेणार असून शेतक-यांच्या समाधानाचे वातावरण पसरले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त