हरितगावासाठी वाघमोडेवाडीकर ग्रामस्थांचा एकजुटीचा निर्धार

दहिवडी : पर्यावरण संतुलननासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी वाघमोडेवाडीकर सरसावले आहेत.याकामी उल्हास बापू मित्र मंडळाने स्वखर्चातून मदतीच हात दिल्याने हरितगाव संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याला मोठी चालना मिळाली आहे.जागतिक वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून पहिल्याच टप्प्यात परिसरात एक हजार वृक्षलागवड करण्यात आली आहे.
                गोंदवले बुद्रुक जवळील वाघमोडेवाडी हे गाव ग्रामविकासासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवून प्रयत्नशील राहिले आहे.आधुनिकतेच्या वाटेवर पर्यावरण संतुलनाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याबाबत ग्रामस्थांमधून चर्चा व्यक्त होत होती.याबाबत रायगडचे वनाधिकारी व वाघमोडेवाडीचे सुपुत्र संजय वाघमोडे यांनी वृक्ष लागवडीबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून उपाययोजना आखण्याचा निर्णय घेतला.पहिल्या टप्प्यात वृक्ष लागवड करण्याच्या भूमिकेला पाठिंबा देत उल्हास बापू मित्र मंडळाने पुढाकार घेतला. विविध जंगली रोपांबरोबरच एक ते दोन वर्षांची एक हजाराहून अधिक मोठी झाडे विनामूल्य देण्यात आली.याशिवाय वृक्ष संरक्षणासाठी ट्री गार्ड तसेच आवश्यक साहित्य स्वखर्चातून देण्यात आले आहे.
                  जागतिक वन संवर्धन दिनाचे औचित्य साधून ग्रामस्थांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रत्यक्षात हाती घेतला आहे.यानिमित्ताने प्राथमिक शाळा परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.गाव व परिसरात केवळ मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणार नाही तर त्याचे संगोपन करून सकारात्मक आदर्श इतरांसमोर ठेऊ असा विश्वास यावेळी जेष्ठ नेते व निवृत्त नायब तहसिलदार शिवाजीराव वाघमोडे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी सरपंच उमेश वाघमोडे,उपसरपंच दिनकर वाघमोडे,उल्हास वाघमोडे,पर्यावरणप्रेमी रोहित व रक्षिता बनसोडे,माजी प्राचार्य पी डी वाघमोडे,माजी सरपंच आनंदराव वाघमोडे,सुनिल वाघमोडे,विठ्ठल खताळ,राजेंद्र सुळे,नितीन हांडे,पोपट खताळ, दिलीप वाघमोडे,शेखर खताळ,नानासो वाघमोडे, उमेश मडके व ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला