वाईत गौण खनिजाची राजरोस लुट.... नंबर नसणारे हायवा शहरातून फिरतात -महसुल प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात

वाई :    कायदेशीर कारवाई आणि दंडात्मक कारवाईच्या भितीने महसूल विभागाच्या परवानगी शिवाय मुठभर गौण खनिज कोणीही उचलत नाही. मात्र हाच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी आर्थिक लागेबांधे ठेवले की राजरोसपणे, किती ही, गौण खनिजाची लुटालूट करता येते. याचा प्रत्यय वाईकरांना गेल्या काही दिवसांपासून येतोय. कोऱ्या नंबर प्लेट असलेल्या हायवा ट्रक शहरातून खचाखच गौण खनिज भरून धुरळा उडवत जात आहेत. मात्र याकडे महसूल विभागासोबत आरटीओ , पोलीसांनी सुध्दा दुर्लक्ष केल्याने ते संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.


 राज्यात सर्वात जास्त लाचखोर प्रकरण ही महसूल विभागाशी संबंधित उघड झाली आहेत. नेहमीच वरकमाईत माहीर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत सामान्य माणसाला रोजचं यांचा प्रत्यय येतो. गेल्या काही दिवसांपासून शहरात राजरोसपणे एका पाठोपाठ एक हायवा, ट्रक खचाखच गौण खनिज भरून धुरळा उडवत वेगाने जात आहेत. सर्व हायवा,ट्रक च्या नंबर प्लेट कोऱ्या असून बड्या धेंड्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी घट्ट आर्थिक बंध असल्याशिवाय एवढे राजरोस धाडस होणार नाही.


 वाई शहरात प्रांत, तहसिलदार, पोलिस उपविभागीय अधिकारी,मंडल अधिकारी यांची कार्यालये आहेत. क्षुल्लक कारणावरून आक्रमक पवित्रा घेणारे असंख्य फुटकळ सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कायद्याचा वापर करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणारे पुष्कळ माईचे लाल आहेत. तर सर्वच राजकीय पक्षांचे बडे नेते याबाबत शांत असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला