फलटण तालुक्यात वाळू आणि मातीचा अवैध उपसा.

मंजूर घरकुलांना शासनातर्फे वाळू देण्यास वाळू शिल्लक राहणार का.?

फलटण. फलटण तालुक्यात बऱ्याच दिवसापासून राजरोसपणे विनापरवाना वाळूची चोरी होत आहे. हे विनापरवाना वाळूची वाहतूक करणारे वाळू सम्राट रात्रीच्या वेळी खुलेआम वाळूची वाहतूक करत असतात. नुकतेच फलटण येथे एकूण 3347 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी बऱ्याचशा लाभार्थ्यांना 15000 चा पहिला हप्ताही पंचायत समिती येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. शासनाने या सर्व घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने पाच बास वाळू मोफत देण्याचे नियोजन केले आहे. 


प्रति लाभार्थी पाच ब्रास याप्रमाणे 16,735 ब्रास वाळूसाठा शासनाकडे असणे गरजेचे आहे. पण तालुक्यात ही राजरोस चालू असणारी वाळू चोरी अशी सतत चालू राहिली तर शासनाला वाळू बाहेरून विकत आणण्याची वेळ येईल. किंवा वाळू उपलब्ध न झाल्यास लाभार्थ्यांना हा भुरदंड सोसावा लागणार आहे. आणि याबाबत फलटण येथील तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याकडून कोणतीही प्रतिबंधक उपाययोजना आज तरी दिसून येत नाही. फलटण तालुक्यातील प्रत्येक गावच्या यात्रांचा आता हंगाम सुरू झाला आहे. या गावातून पुणे मुंबई व इतरत्र नोकरी धंद्यासाठी गेलेले शेतकरी त्यांच्या येथील शेत जमिनी पडून असतात याचा गैरफायदा घेऊन हे वाळू सम्राट त्यांच्या शेतात मोठे मोठे खड्डे काढून त्यात असणारी वाळू आणि माती अगदी स्वतःचा हक्क दाखवून परस्पर विक्री करत असतात.


 तालुक्यात असणाऱ्या वीट भट्टीवर या शेतकऱ्यांच्या शेतातील माती विकली जाते. याबाबत ही कोणती ठोस उपाय योजना शासनाच्या वतीने तालुक्यात दिसून येत नाही यामुळे वर्षातून एकदा येणारे येथील जमीनधारक आपल्या शेताची झालेली नासधूस, नुकसान पाहून नाराज होत आहेत. याबाबत शासनाने प्रतिबंधकात्मक उपाय करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला