शिवतीर्थ परिसरावर अतिक्रमण नको शनिवार पेठेतील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; नव्या आयलँडला विरोध
Satara News Team
- Sat 17th Jun 2023 10:54 am
- बातमी शेयर करा
सातारा : शिवतीर्थावर नवीन आयलँड उभारण्याच्या प्रशासकीय कामाला शनिवार पेठेतील नागरिकांनी निवेदनाद्वारे आक्षेप घेतला आहे. माजी नगरसेविका आशा पंडीत व किशोर पंडीत या दांपत्याच्या नेतृत्वाखाली येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपल्या तीव्र स्वरूपाच्या भावना कळवल्या.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की शिवतीर्थावर नवीन आयलैंड उभे करण्याचे नियोजन शासनाकडून सुरू आहे. मुळात येथे रस्ते अरुंद असल्याने वाहतूक विस्कळीत होत असते. त्यातून अनेकदा अपघाताची स्थिती निर्माण होते. सिव्हिल हॉस्पिटलसहित बरेच मोठे दवाखाने याच रस्त्यावर असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड रहदारी असते.अशा स्थितीत नवीन आयलैंड निर्माण केल्यास वाहतुकीला अडथळा होण्याबरोबरच परिसर विद्रूप दिसणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तात्काळ थांबवण्यात यावा आणि आम्ही सुचवलेल्या शहराच्या काही हिताच्या विषयांवर प्रशासनाने लक्ष द्यावे.
स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या नावाने नवीन प्रकल्प उभा केल्यास समाजात वेगळा संदेश जाणार आहे. शिवतीर्थापासून दीडशे मीटर परिसरात सेन्सिटिव्ह झोन जाहीर करण्यात यावा,याशिवाय अजिंक्यतारा येथे शिवसृष्टी निर्माण करणे,माथेरानच्या धर्तीवर मिनी रेल्वे तयार करणे,कास पठारावर झू पार्क आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे गार्डन तयार करणे,शहराचा पाणी प्रश्न गंभीर असून,शहरासाठी नवीन पाणी योजना लागू करून त्या योजनेला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव द्यावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
नाक्यावरील आयलँडचा विषय तात्काळ रद्द करावा अशी कळकळीची मागणी शनिवार पेठेतील नागरिकांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर येथील २२ नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 17th Jun 2023 10:54 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 17th Jun 2023 10:54 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sat 17th Jun 2023 10:54 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 17th Jun 2023 10:54 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 17th Jun 2023 10:54 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 17th Jun 2023 10:54 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 17th Jun 2023 10:54 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sat 17th Jun 2023 10:54 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sat 17th Jun 2023 10:54 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 17th Jun 2023 10:54 am









