माजी उपसभापती चंद्रकांत कदम (पाटील) यांचे निधन.
Satara News Team
- Sat 13th Jun 2026 11:24 am
- बातमी शेयर करा
पुसेसावळी : (ता. खटाव) येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक ज्येष्ठ आणि आदराचे व्यक्तिमत्त्व, खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत शंकरराव कदम (पाटील) यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. 'दादा' या टोपणनावाने अत्यंत परिचित असलेल्या चंद्रकांत दादांच्या जाण्याने पुसेसावळी गावासह संपूर्ण खटाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
खटाव पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. आपल्या पदाचा वापर नेहमीच सर्वसमान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केला. अत्यंत शांत, संयमी आणि संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख होती. सुख-दुःखात धावून जाणारा नेता हरपल्याने तालुक्याने एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
पुसेसावळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुर्यकांत पाटील (सुरेश बापू), सेवानिवृत्त शिक्षक संभाजी पाटील यांचे ते ते बंधू होते. विद्यमान पंचायत समिती सदस्य संग्राम पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, भाऊ, पत्नी, मुलगी, मुलगा, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. कदम पाटील कुटुंबाचा मुख्य आधारवड कोसळल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अंत्यसंस्कार आज शनिवार, १३ जून रोजी दुपारी ४:०० वाजता पुसेसावळी येथे करण्यात येणार आहेत. रक्षाविसर्जन रविवार, १४ जून रोजी पुसेसावळी येथे सकाळी आयोजित करण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 13th Jun 2026 11:24 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 13th Jun 2026 11:24 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sat 13th Jun 2026 11:24 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 13th Jun 2026 11:24 am
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Sat 13th Jun 2026 11:24 am
संबंधित बातम्या
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Sat 13th Jun 2026 11:24 am
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 13th Jun 2026 11:24 am
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Sat 13th Jun 2026 11:24 am
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Sat 13th Jun 2026 11:24 am
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Sat 13th Jun 2026 11:24 am
-
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Sat 13th Jun 2026 11:24 am










