कराड उत्तरच्या आमदारांचे वरातीमागून घोडे : मनोजदादा घोरपडे
सतीश जाधव
- Mon 15th Jul 2024 04:22 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : मसूर येथील सुयोग मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. भरतनाना पाटील जिल्हाध्यक्ष धर्यशीलदादा कदम कराड उत्तर निवडनुक प्रमुख मा.मनोजदादा घोरपडे प्रदेश सचिव मा. रामकृष्ण वेताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अर्थसंकल्प 2024 -25 चे वाचन व विधानसभेची आढावा बैठक पार पडली
यावेळी बोलताना मा.मनोजदादा म्हणाले लोकसभेला कराड उत्तर मधून चांगलं मतदान झाले याबद्दल सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेतले आहे.कराड उत्तरचे आमदार हे बिनकामाचे आमदार म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. गेली पंचवीस वर्षे आमदारकी असताना कधीही विधानभवनामध्ये चकार शब्द न बोलणारे आमदार स्वतः साखरवाडी गावचा प्रश्न उपस्थित करतात ही बाब फार हास्यास्पद आहे. आज पर्यंत तुम्ही ज्या गावाला साधा रस्ता उपलब्ध करून देऊ शकला नाही ही तुमची बिनकामाची पद्धत आहे. आज आपण आरोग्य विषयावरती काम करायचा आभास निर्माण करत आहात परंतु हे आपले वरातीमधून घोडे चाललेले आहे. गेली दहा वर्ष आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण या विषयावरती काम करत असताना जवळपास 13000 पेक्षा जास्त लोकांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन केलेली आहेत. आणि तेवढ्याच लोकांना मोफत चष्मे वाटप केलेले आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी 50% मोबदल्यामध्ये आम्ही शेती पंप वाटप करत आहोत. माता-भगिनींसाठी 50% सवलतीच्या दरामध्ये आटा चक्की चे वाटप करत आहोत. शैक्षणिक सामाजिक,क्रीडा क्षेत्रात अमूल्य असे आम्ही काम केलेले आहे आणि तुम्ही आजपर्यंत असं कोणतंही काम केलेले नाही जोपर्यंत तुमच्याकडे लोक होती तोपर्यंत तुम्ही असं काही केलं नाही आज तुमच्याकडे लोकच उपलब्ध नाही त्यामुळे तुम्ही असे काम करायला सुरुवात केलेली आहे. परंतु तुम्ही आणलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आता लोकच उपलब्ध राहिलेली नाहीत. बिनकामाच्या आमदारांना आता जनता कंटाळली असून येणाऱ्या विधानसभेला जनता आपल्याला निश्चितच घरी बसवणार आहे.
यावेळी बोलताना मा.भारतनाना पाटील म्हणाले सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगले यश मिळाले असून अर्थसंकल्प 2024-25 मध्ये चांगल्या पद्धतीने सर्व सामान्य गोरगरिबांना न्याय देण्याचे काम या सरकारने केलेली आहे.
यावेळी बोलताना मा.धर्यशीलदादा कदम म्हणाले लोकसभेला कराड उत्तर मधून चांगले मतदान झाले असून येणाऱ्या विधानसभेला कराड उत्तरचा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा असेल त्यासाठी आपण सर्वांनी मिळून कामाला लागावे.यावेळी रामकृष्ण वेताळ यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी रहिमतपूर मंडल अध्यक्ष श्री.भीमराव काका पाटील, कराड-उत्तर मंडल अध्यक्ष श्री शंकरराव शेजवळ काका, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री. चिन्मय कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस श्री. विठ्ठल बळशेटवार, जिल्हा सरचिटणीस श्री.सुनील शिंदे बापू, रहिमतपूर मंडल महिला अध्यक्षा अंजली जाधव, कराड उत्तर महिला अध्यक्षा सिमा घार्गे, कराड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री.राजेंद्र चव्हाण, पंचायत समिती सदस्य श्री.आण्णासाहेब निकम, श्री.नवीन जगदाळे, तसेच कराड-उत्तर विधानसभेतील बूथ अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.सूत्रसंचालन जितेंद्र मोरे यांनी तर आभार गणेश घोरपडे यांनी मानले.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 15th Jul 2024 04:22 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 15th Jul 2024 04:22 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 15th Jul 2024 04:22 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 15th Jul 2024 04:22 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 15th Jul 2024 04:22 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 15th Jul 2024 04:22 pm
संबंधित बातम्या
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 15th Jul 2024 04:22 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 15th Jul 2024 04:22 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Mon 15th Jul 2024 04:22 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Mon 15th Jul 2024 04:22 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 15th Jul 2024 04:22 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Mon 15th Jul 2024 04:22 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Mon 15th Jul 2024 04:22 pm










