ओबीसी आरक्षण बचाव उपोषण तूर्तास स्थगितिची हाकेंची घोषणा
Satara News Team
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm
- बातमी शेयर करा

वडीगोद्री: आज दुपारी सव्वा दोन वाजता शासनाचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले. शिष्टमंडळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर हाके यांनी उपोषण तूर्तास स्थगित केल्याची घोषणा केली. शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी तब्बल दहा दिवसांपासून सुरू उपोषण सोडले. दोन-तीन मागण्या सोडल्या तर सर्वच मागण्या पूर्ण झाल्या आहेत, सगेसोयरेचा आदेश आणखी आला नाही, तो सर्वपक्षीय बैठकीनंतर निघेल असे शासनाचे आश्वासन ग्राह्य धरून उपोषण स्थगित करण्यात आले आहे. इतर मागण्यांवर शासनाची श्वेत पत्रिका मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे हाके यांनी जाहीर केले.
आम्ही मागणी केलेल्या तीन मुद्यांची पूर्तता होईल असे शासनाने लिखित स्वरूपात दिले आहे. तर आणखी दोन मुद्दे पूर्ण झाले नाहीत. यापुढे हे आंदोलन सुरूच राहील. विक्रमी वेळेत बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शासनाने बोगस प्रमाणपत्र काढणारे आणि ते देणारे या दोघांवर कारवाई करण्यात येईल असे शासनाने सांगितले आहे. पुढचा लढा पंचायतराज मधील ओबीसी आरक्षण सुरक्षित करण्याचा आहे.
शासनाच्या शिष्टमंडळात कोण होते
राज्य शासनातील मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, धनंजय मुंडे हे पाच मंत्री आहेत. तर गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे ओबीसी नेते सुद्धा आहेत. यावेळी उपोषणस्थळी ओबीसी बांधवांची मोठी गर्दी झाली आहे.
स्थानिक बातम्या
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm
वडोली निळेश्वर येथील महिला मेळाव्यातून महिला सशक्तिकरण व सबळीकरणाचा नारा
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm
रहिमतपुरात अश्लील चाळे चालणाऱ्या कॅफेचालकावर कारवाई
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm
वाठार पेट्रोल पंपावरील दरोड्याप्रकरणी तिघे गजाआड
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm
संबंधित बातम्या
-
गोविंद मिल्कच्या आयकर तपासणीबाबत महत्वाची माहिती समोर
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm
-
वडोली निळेश्वर येथील महिला मेळाव्यातून महिला सशक्तिकरण व सबळीकरणाचा नारा
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm
-
सुरूचि महिला ग्रंथालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा आनंदात संपन्न
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm
-
राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm
-
खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm
-
सातारा पोलिसांचा सूर्या श्वान देशात अव्वल ! अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात सन्मान
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm
-
महाराष्ट्रतील बार्टी आधिनस्त कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm
-
पुसेगाव येथे रस्त्याच्या कामासाठी कडकडीत बंद
- Sat 22nd Jun 2024 04:17 pm