वर्णेतील देवस्थान मंडळावर नवीन विश्वस्तांची निवड

वर्णेतील देवस्थान मंडळावर नवीन विश्वस्तांची निवड

देशमुखनगर : आबापुरी- वर्णे (ता. सातारा) येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथ देवस्थान विश्वस्त मंडळावर नवीन विश्वस्तांची निवड करण्यात आली आहे. नवीन विश्वस्तांनी पदभार स्वीकारला आहे.

पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी कायदेशीर पध्दतीने मागविलेल्या अर्जदारांतून मुलाखतीद्वारे नवीन विश्वस्तांची निवड करण्यात आली.
त्यातून रामचंद्र दत्तात्रय पवार, भाऊसाहेब शामराव पवार, मानसिंग बाबूराव काळंगे, अशोककुमार तानाजी काळंगे, सूर्यकांत संपतराव पवार, शशिकांत बाळकृष्ण पवार, विकास कुंडलीक काळंगे, हेमंत चंद्रकांत पवार व भैरवनाथ अरविंद कुदळे- पुजारी यांची निवड करण्यात आली.  

नवीन विश्वस्तांचे देवस्थानचे शिवकळा अधिकारी श्रीप्रकाश कुलकर्णी यांनी स्वागत केले. येत्या कार्यकालात देवस्थानचा सर्वांगीण विकास करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही नवीन विश्वस्त समितीतर्फे देण्यात आली. विविध उत्सवांच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना पाणी, स्वच्छतागृहे तसेच इतर सर्व भौतिक सुविधा देण्यास नवीन विश्वस्त मंडळ कटीबध्द राहिल, असेही नमूद करण्यात आले. ग्रामपंचायत, ग्रामस्थ, मानकरी, चाकर व सर्व भाविक यांच्या समन्वयातून यापुढील कारभार चालविला जाईल, असे नवनियुक्त विश्वस्तांनी यावेळी सांगितले. नवीन विश्वस्तांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
या निवडीबद्दल नागठाणे विभाग पत्रकार संघातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

वर्णे-आबापुरी (ता. सातारा):  देवस्थानचे शिवकळा अधिकारी श्रीप्रकाश कुलकर्णी यांच्यासह नवनियुक्त विश्वस्त मंडळ.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त