राजमान्य अॅग्रो कडून ३० शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाण्यांचे वाटप.

औंध  : औंध ता.खटाव येथील राजमान्य अॅग्रो प्रोसेसिंग प्रोडूसर कंपनी यांच्याकडून मा . बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प च्या माध्यमातून तीस शेतकऱ्यांना सोयाबीन मूल्य साखळी विस्तार अंतर्गत मोफत बियाणे व औषधांचे किट याचे वाटप करण्यात आले. राजमान्य अॅग्रो प्रोसेसिंग प्रोड्युसर कंपनी लिमिटेड औंध, यांचेकडून दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग अंतर्गत ३० शेतकऱ्यांची कंपनीमार्फत निवड करण्यात येते व त्यांना शेतीशाळा, प्रकल्प व औषधे तसेच बियाणे यांचे वाटप करण्यात येते यंदा सोयाबीन के. डी. एस. ७२६ फुले संगम या नवीन वाणाचे वाटप करण्यात आले.
        या वितरण प्रसंगी मंडल कृषी अधिकारी श्री.अक्षय सावंत व कृषी पर्यवेक्षक श्री.खंडू शिंदे उपस्थित होते. तसेच श्री.सावंत यांनी सोयाबीन पिकाचे महत्त्व व उत्पादन वाढीसाठी घ्यावयाची काळजी तसेच कीड नियंत्रणाची संपूर्ण माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक श्री.शिंदे यांनी शेती शाळेचे एकूण सहा वर्गाचे नियोजन केल्याचे सांगितले. त्यातील पहिल्या दोन वर्गात माहिती व मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले. या प्रसंगी शिवाजी चव्हाण, सुजाता गायकवाड, सुनीता दाभाडे, राजमान्य पी.एफ.ओ. अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच गीतांजली यादव, अनिता दाभाडे, मीरा गुरव, शशिकला देशमुख, नजीर खलिफा, भारती देशमुख, रूपाली घाडगे, संतोष कुंभार, हणमंत गायकवाड, जस्मिन मणेर व राजमान्य अॅग्रो चे संस्थापक माजी कृषी अधिकारी श्री.दिलीप दाभाडे उपस्थित होते. या झालेल्या उपक्रमांमधून शेतकऱ्यांना भरघोस फायदा होईल अशी आशा यावेळी श्री. दिलीप दाभाडे यांनी व्यक्त केली.

बियाणे वाटप करताना श्री.दिलीप दाभाडे व लाभार्थी शेतकरी.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त