लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी येणार याची लाभार्थी महिलांना उत्सुकता लागली होती. डिसेंबरचा तिसरा आठवडा संपत आला तरी लाडकी बहिण योजनेचा हप्ता मिळाला नव्हता. मकर संक्रांतीदरम्यान डिसेंबर आणि जानेवरीचे दोन्ही हप्ते एकत्र मिळतील अशी चर्चा होती. मात्र त्याला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण विराम दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार याबाबत अधिवेशनात माहिती दिली. त्यामुळे लाभार्थी महिलांचा जीव भांड्यात पडला. याशिवाय स्क्रूटनी आणि निकषांमधील बदलावर देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं. आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही. सहावा हप्ता याच महिन्यात मिळणार, अधिवेशन संपल्यानंतर लगेचच खात्यावर पैसे येणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

     अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. 23 डिसेंबरपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होतील अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. याबरोबरच लाडकी बहीण योजनेचे निकष तूर्तास तरी बदलण्यात येणार नाहीत असं फडणवीस यांनी स्वत: अधिवेशनात सांगितलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राज्यात चांगलीच चर्चेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राज्यात चांगलीच चर्चेत आहे. महायुती सरकारने जुलै 2024 पासून ही योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत. आतापर्यंत या योजनेचे जुलै ते नोव्हेंबरचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.  रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना रक्षा बंधनाची भेट देत योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात पाठवले होते. यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या हप्त्यांचे तीन हजार रुपये देण्यात आले होते. राज्यसरकारने जुलै ते नोव्हेंबर असे मिळून आतापर्यंत साडे सात हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केलेत. मात्र डिसेंबरचा हप्ता अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. नवीन अर्ज प्रक्रिये विषयी संभ्रमावस्था लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांना रक्षाबंधनापासून हप्ते मिळणे सुरू झाले आहे.


   तर दुसरीकडे काही कारणास्तव पहिल्या टप्प्यात अर्ज करू न शकलेल्या महिलांना मात्र, त्या पात्र असूनही या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे लाडकी बहिण योजनेपासून वंचित असलेल्या महिलांचे अर्ज तातडीने जमा करून घ्यावेत अशी मागणी महिला वर्गाकडून केली जात आहे.  याबाबत प्रशासकीय अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता, या योजनेच्या पुढील कार्यवाहीसाठी कोणत्याच सुचना प्राप्त झाल्या नसल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर सध्या लाडकी बहिण योजनेच्या वेबसाईटवर देखील अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे जो पर्यंत नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या मंत्री मंडळाचं खाते वाटप केलं जात नाही तोपर्यंत याबाबत कोणतीच माहिती देता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त