जिल्हा रुग्णालय सातारा येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ

सातारा : पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये संपूर्ण देशात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे माननीय आरोग्यमंत्री नामदार श्री प्रकाश जी आबिटकर यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात या कालावधीमध्ये महिलांसाठीचे विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हा रुग्णालय सातारा येथे या अभियानाचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक संचालक, हिवताप विभाग डॉक्टर प्रताप सारणीकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक मेजर डॉक्टर राहुलदेव खाडे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उप  अधिष्ठाता डॉक्टर दास वाणी, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोसावी, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभाष कदम, या अभियानाच्या जिल्हा नोडल ऑफिसर डॉक्टर सलमा इनामदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी माननीय जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन करताना स्त्रियांबरोबरच सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे ,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राहुल देव खाडे, यांनीही उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले व या अभियानांतर्गत अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले

सातारा जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय अशा सर्व स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. या अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात एकूण 967 महिला रुग्णांची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.


या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर चंद्रकांत काटकर,  डॉक्टर राहुल जाधव, डॉक्टर अरुंधती कदम, डॉक्टर उत्कर्षा साळुंखे, डॉक्टर संजीवनी शिंदे, डॉक्टर टकले, डॉक्टर किरण जाधव,आधिसेविका श्रीमती कळसेकर ,परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती पुंड तसेच रुग्णालयातील व वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय सामाजिक अधीक्षक श्री व्यंकटेश गौर यांनी केले तसेच प्रास्तविक व आभार प्रदर्शन डॉक्टर सुजाता राजमाने यांनी केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला