कोरेगाव नगरपंचायतीतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी रमेश उबाळे यांचे तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन


कोरेगाव ; नगरपंचायतीच्या विविध विभागांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी असणाऱ्यांना निलंबित करण्याच्या मागणीसह सोळशी, ता. कोरेगाव येथील श्री शनेश्वर देवस्थान परिसरात पाणीटंचाई असल्याने तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. प्रशासनाने याविषयी तातडीने न्याय न दिल्यास प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिनी दि. २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नगरपंचायतीच्या आझाद चौक भाजी मंडई संकुल इमारत बांधकामामध्ये गैरप्रकार झाला असून निविदा प्रक्रियेपासून या विषयामध्ये गैरव्यवहार झालेला आहे, त्याची चौकशी करावी. नगरपंचायतीने बोगसरित्या इन्वर्टर आणि बॅटरी खरेदी करून गैरव्यवहार केला आहे, त्याची चौकशी करावी. घनकचरा संकलन व प्रक्रिया प्रकल्पामध्ये देखील गैरव्यवहार झाला असून याविषयी सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित गोष्टींना मुख्याधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी उबाळे यांनी केली आहे.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात सोळशी येथे श्री सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान असून तिथे देखील मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत आहे. प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी चालढकल करत आहे. तात्काळ देवस्थान परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनास सुरुवात केली असल्याचे उबाळे यांनी सांगितले.
सोमवारपासून ठिय्या आंदोलन हे नगरपंचायत कार्यालयासमोर केले जाणार होते, मात्र काही कारणास्तव ते तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आले आहे. प्रशासनाने या प्रकरणी चौकशी करून न्याय न दिल्यास दि. २६ जानेवारी रोजी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे उबाळे यांनी सांगितले.
रमेश उबाळे यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक कार्यकर्ते दिनेश सणस, डॉ. गणेश होळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त