सातारच्या मेडिकल वाल्यांचे करायचं काय

इतर मेडिकलची पावती असल्यास औषधे दिली जात नाहीत

शिवथर : सातारा शहरांमध्ये विविध क्षेत्रातील बरेच डॉक्टर आणि हॉस्पिटल आहेत या ठिकाणी पेशंट गेला असता त्यांना डॉक्टर पावती लिहून देतात सदरची पावती ज्या मेडिकलची दिलेली आहे त्याच मेडिकलमध्ये औषध घेतली जातात परंतु ज्या मेडिकल मधून औषधे घेतली जातात त्या ठिकाणी जर एखाद औषध नसेल तर तीच पावती घेऊन इतर मेडिकल मध्ये गेल्यास तो मेडिकल वाला औषध देत नाही त्यामुळे या मेडिकल वाल्यांचे करायचं तरी काय असाही सवाल पेशंट व त्यांच्या नातेवाईक यांनी उपस्थित केला आहे. 

 


          सातारा येथे ग्रामीण भागातून बरेच पेशंट डॉक्टरांच्या कडे येत असतात बऱ्यापैकी ग्रामीण भागातील अशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात डॉक्टरांकडे गेला असता त्यांना मेडिकल मधून औषधे घेण्यासाठी पावती दिली जाते ती पावती घेऊन मेडिकलमध्ये गेले असता चुकून एखाद औषध त्यांच्याकडे नसेल तर तीच पावती दुसऱ्या मेडिकलमध्ये घेऊन गेले असता त्यांना औषध दिले जात नाही त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे ग्रामीण भागातील लोकांना सातारा येणे जाणे शक्य होत नाही याची दखल कोण घेणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे जर डॉक्टरांनी दिलेली औषधाची पावती ज्या मेडिकलची दिलेली आहे तिथे न जाता तीच पावती घेऊन दुसऱ्या मेडिकलमध्ये गेले असता औषधे दिली जातात परंतु अपुरी औषधे मागितली तर का दिली जात नाहीत असाही सवाल उपस्थित केला जात आहे साताऱ्यातील सर्वच मेडिकल वाले पेशंट औषधे घेऊन सुद्धा त्यांना पावती देत नाहीत याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक दवाखान्यामध्ये येत असतात औषध घेतही असतात परंतु मेडिकल मधून त्याची पावती का दिली जात नाही याबाबत ही शंका व्यक्त केली जात आहे या मेडिकल वाल्यांच्या वर निर्बंध कोण घालणार असाही सवाल जनतेमधून केला जात आहे.
           "मेडिकल दुकानदार जर अशा पद्धतीने कृत्य करत असतील तर ते पूर्ण चुकीच आहे त्यांना असे करता येणार नाही त्यामुळे मी आजच सर्वच मेडिकल दुकानदारांना समज देतो परंतु जर त्यामध्ये सुधारणा न झाल्यास औषध प्रशासन विभागाला त्यांची तक्रार देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडतो "
प्रवीण पाटील (मेडिकल असोसिएशन अध्यक्ष सातारा)

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त