कळंभे येथील निरंजना नदीवरील पुलावर भले मोठे खड्डे , सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार का,?

वाई : वाई व जावली तालुक्याच्या सीमेवर निरंजना नदीवरी पुल २४ ते २५ वर्ष झाली  बांधण्यात आला असून, दळणवळणासाठी कुडाळ सर्जापूर कळंभे विरमाडे मार्गे सातारला जाण्यासाठी जवळचा मार्ग समजला जातो, तसेच कुडाळ गावची बाजारपेठ मोठी असल्याकारणाने कळंभे तसेच इतर गावातील ग्रामस्थांना याच पुलाचा दळणवळणासाठी वापर करून अनेक ठिकाणी जावे लागत आहे 


 सततच्या लहान मोठ्या वाहनांच्या वाहतुकीमुळे या पुलावर भले मोठे खड्डे पडले असून हे खड्डे मोठे झाल्यास मोठा अनर्थ घडू शकतो,हा पूल उभा केल्यापासून कधीही या पुलावरील खड्डे मुजवण्यात आले नाहीत,
कळंभे गावच्या युवकांनी एकत्र येऊन स्वखर्चाने कितीतरी वेळा वाळू सिमेंटने खड्डे मोजण्याचा प्रयत्न केलाआहे
  प्रशासनाचे याकडे नेहमीच दुर्लक्ष आहे,  पुलावरील पडलेल्या खड्ड्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकर लक्ष द्यावे व न दिल्यास कळंभे गावातील नागरिक तीव्र आंदोलन करतील अशी प्रतिक्रिया कळंभे गावचे ग्रामस्थ आनंदराव नलावडे यानी सातारा न्यूज वर आपली भावना तीव्र शब्दात व्यक्त केली आहे 


 यावेळी कळंभे गावचे ज्येष्ठ नागरिक श्री चित्तरंजन गायकवाड म्हणाले की कळंभे आणि सर्जापूर निरंजना नदीवरील पूल मदन आप्पांनी आमदार असताना बांधला आहे तरी आज या पुलाची अवस्था बिकट आहे यामुळे पुलावर पडलेले खड्डे मुजवण्यात यावे अशी प्रतिक्रिया त्यांनी सातारा व्यक्त केली
   यावेळी श्री लक्ष्मण जाधव व विकास सेवा सोसायटी कळंभे चेअरमन श्री यशवंत जगन्नाथ शिवथरे सदस्य श्री यशवंत शंकर शिवथरे श्री मोहन वाघ व युवा अध्यक्ष सातारा जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ श्री जितेंद्र गायकवाड तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त