पांचगणी व परिसरात वृक्ष उन्मळून पडले, जनजीवन विस्कळित

पाचगणी : पाचगणी शहर व परिसरात आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्री वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. यामुळे काही काळ मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली तर काही ठिकाणी वीज गायब झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की गेले चार ते पाच दिवसापासून पाचगणी शहर व परिसरात रिमझिम पावसाची हजेरी होती. परंतु काल रात्रीपासून पावसाने धुवाधार पणे कोसळत होता. पांचगणी – राजपुरी मार्गावर रात्रीच्या पावसाने नचिकेत हायस्कूल समोर भला मोठा निरगील वृक्ष उन्मळून पडला रस्त्याच्या मधोमध हा वृक्ष आडवा झाल्याने सकाळ पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.

ग्रामीण भागातील शेतकरी सुध्दा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. आज रात्रीपासून पावसाने जोरदारपणे हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग आनंदला आहे. पाचगणी शहरात आज सकाळपासून मोठ्या मोठ्या सरी कोसळत होत्या. यामुळे बऱ्याच पर्यटकांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. तर पाचगणी शहरात अनेक ठिकाणी जलमय वातावरण झाले होते.
ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते हा पाऊस सुरू झाल्याने शेतकरी वर्ग आनंदला आहे. जावळी तालुक्यातील करहर , दापवडी, बेलोशी, रुईघर या परिसरा बरोबरच हुमगाव , हातगेघर, घोटेघर परिसरातही भात पीक मोठ्या प्रमाणात घेतली जाते. मोठा पाऊस नसल्याने भात लावणीला विलंब होत होता. आजच्या पावसाने दोन दिवसात भात लागवड सुरू होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त