स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची ४१ वी पुण्यातीथी रानगेघर ता .जावली येथे साजरी

जावली :  रानगेघर ता . जावली येथे  आखिल भारतीय मराठा महाहासंघ संस्थापक अध्यक्ष माथाडी कमगारांचे आराध्यदैवत कै अण्णासाहेब पाटील यांची ४१ वी पुण्याथीती  ग्रामस्थ मंडळ,नवतरुण मंडळ आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थितीत  साजरी करण्यात आली .प्रथमता माहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी  महाराज व कै अण्णासाहेब पाटील यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन माथाडी कामगार श्री पाडूरंग भिकू सपकाळ तसेच फौजी रिटायर धर्मराज भोसले ,अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील आणि उपजिल्हाआध्यक्ष श्री महेश गाडवे साहेब व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने नुकतीच अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका अध्यक्ष पदी निवड झालेले तरुण तडफदार श्री ज्ञानेश्वर दादा करंदकर यांचा नागरी सक्तार करण्यात आला अनेक मान्यवरांनी कै अण्णासाहेब पाटील यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी काळेश्वरी विकास सोसायटी चे चेअरमन, विठ्ठल भाऊ करंदकर तसेच चंद्रकांत भोसले ,संपत करंदकर, शाळा कमिटी अध्यक्ष राजेंद्र विठ्ठल करंदकर श्रीरंग भोसले,जनार्दन करंदकर तसेच धर्मराज भोसले, शिवाजी करंदकर सोसायटी सदस्य, तसेंच साईनाथ सपकाळ, पाडूरंग करंदकर असे अनेक माथाडी कामगार उपस्थित होते सत्कार मूर्ती ज्ञानेश्वर दादा यंचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा श्री जितेंद्र भोसले मराठा महासंघ सरचिटणीस सातारा जिल्हा यांनी केल कार्यक्रमाच्या शेवटी अनिल करंदकर यांनी सर्वांचे आभार मानले

 

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त