आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर सातारा रोड येथील सरफराज सय्यद एल एल बी पदवी उत्तीर्ण
निसार शिकलगार- Sat 20th Aug 2022 06:20 am
- बातमी शेयर करा
सातारा रोड : जमीयत उलमाये हिंद कोरेगाव कमिटीच्या वतीने सातारा रोड येथील सामाजिक कार्यकर्ते सरफराज सय्यद यांनी एलएलबी ही वकिली डिग्री पास केल्याने त्यांचे कोरेगाव येथे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. सरफराज सय्यद हे नेहमीच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होते. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना, त्यांना सातारा रोड मध्ये अनेक विविध समस्यांना तोंड द्यावे लागले होते, समाजाच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी आवाज उचलूनही त्यांना दाद मिळत नव्हती, पण, सरफराज सय्यद हे हार म्हणणाऱ्यातले नव्हते, आणि त्यांनी गोरगरीब, तसेच सर्वसामान्य जनतेसाठी आपणाला काहीतरी करता आले पाहिजे या जिद्दीने,चिकाटीने, धर्याने, लॉ कॉलेजला ऍडमिशन घेऊन मोठ्या चिकाटीने प्रयत्न करून यशस्विता मिळवली आणि ते एक वकील बनले आहेत, नुकतेच त्यांना एलएलबी पदवी प्राप्त झाली आहे. या त्यांच्या यशाबद्दल कोरेगाव तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्यांक अध्यक्ष सादिक भाई शेख, आणि जमीयत उलमाये हिंद कोरेगाव अध्यक्ष हाफिज वाजिद सौदागर, उपाध्यक्ष मोहसिन कागदी, सदस्य कमिटी कपिल सौदागर, शाकीर कुरेशी, वारीस कुरेशी, आसिफ खान, अन्वर कुरेशी, रफिक सय्यद, जावेद बागवान, शहानवाज सौदागर, वाहिद भाई, अफझलभाई रमजानभाई व दोस्त नातेवाईक व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 20th Aug 2022 06:20 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 20th Aug 2022 06:20 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sat 20th Aug 2022 06:20 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 20th Aug 2022 06:20 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 20th Aug 2022 06:20 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 20th Aug 2022 06:20 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 20th Aug 2022 06:20 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sat 20th Aug 2022 06:20 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sat 20th Aug 2022 06:20 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 20th Aug 2022 06:20 am









