किल्ले अजिंक्यतारा रस्त्यासाठी ५ कोटी निधी मंजूर

आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; पर्यटन विभागाकडून मिळवला निधी

सातारा- ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारावर जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली होती. त्यामुळे पर्यटक आणि सातारकरांची मोठी गैरसोय होत होती. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे हि गैरसोय दूर झाली असून किल्ले अजिंक्यताराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी महाराष्ट्राच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून तब्ब्ल ५ कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून अजिंक्यतारा किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. यामुळे पर्यटक आणि खास करून सकाळी व सायंकाळी किल्ल्यावर वॉकिंगसाठी जाणाऱ्या लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. सर्वांचाच त्रास दूर करण्यासाठी, किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून अजिंक्यतारा किल्याच्या रस्त्याच्या मजबुतीकरण व सुधारणा करण्यासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 


भरीव निधी उपलब्ध झाल्याने किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. तातडीने निविदा प्रक्रिया व इतर सोपस्कार पूर्ण करून काम त्वरित सुरु करा. काम दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.  

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला