दुर्मीळ जातीचे मऊ पाठीचे कासव आपल्या रिसाॅर्टमधील फिशटँकमध्ये पाळणे रिसाॅर्ट मालकाच्या अंगलट

 

महाबळेश्वर : दुर्मीळ जातीचे मऊ पाठीचे कासव आपल्या रिसाॅर्टमधील फिशटँकमध्ये पाळणे रिसाॅर्ट मालकाला अंगलट आले आहे. वन विभागाने कारवाई करून दुर्मीळ जातीचे कासव तर ताब्यात घेतलेच परंतु रिसाॅर्टचे मालक विजय बबन शिंदे (रा. हरचंदी, ता. महाबळेश्वर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर असलेल्या हरचंदी गावातील मोरेवाडी येथील नीलमोहर ॲग्रो रिसाॅर्टमधील फिशटँकमध्ये दुर्मीळ जातीचे व मऊ पाठीचे कासव रिसॉर्ट मालकाने पाळले आहे. अशी माहिती सोमवारी सकाळी वन विभागास मिळाली. यानुसार वन विभागाच्या पथकाने हरचंदी येथील रिसाॅर्टवर छापा घातला.

रिसॉर्टमधील फिशटँकमध्ये दुर्मीळ व मऊ पाठीचे कासव आढळून आले. वन विभागाच्या विशेष पथकाने दुर्मीळ जातीचे कासव ताब्यात घेतले व हाॅटेलचे मालक विजय बबन शिंदे यांचेवर वन्यजीव संरक्षण १९७२ चे कलम २, ९, ३९, ४४, ५० व ५१ अन्वयेे वन गुन्हा दाखल केला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त