वडूज येथे महामानवास मानवंदना

वडूज येथे आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पुसेसावळी : बहुजन हितकारणी संस्था व भिमाई महिला मंडळ वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त मुलांच्या साठी फनी गेम्स महिलांसाठी संगित खुर्ची, लिंबू चमचा भिमगितांचा जलसा व प्रबोधनपर व्याख्यान असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाचे प्रमुख मा. प्रबुद्ध साठे याप्रसंगी बोलताना  सामाजिक विषमता, अनिष्ट  रुढी, परंपरा, व्यसनाधीनता, शिक्षणाचे महत्त्व अशा विविध विषयावरती आपले विचार व्यक्त केले.
          डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट तसेच त्यांचे कार्य हे ठराविक जाती, धर्मापुरते मर्यादित नसून सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. आंबेडकरांचे विचार म्हणजेच आंबेडकरवाद हाच लोकशाही राष्ट्रवाद आहे. आंबेडकरवाद सोडून देशाचे हित आपल्याला साधता येणार नाही. भारत देशाला महासत्ता बनायचे असेल तर संविधानाची अंमलबजावणी ही प्रभावीपणे झाली पाहिजे. त्याचबरोबर भारत हा सार्वभौम देश आहे यामध्ये विविध जाती, धर्म,पंथ,असल्यामुळे धर्म हित हे राष्ट्रहित होऊ शकत नाही तसेच धर्म सत्ताही राष्ट्र सत्ता होऊ शकत नाही.
          बौद्ध धर्म हा पूर्वीचा भारताचा एकमेव धर्म होता की जो भारतामधून सर्व जगामध्ये पसरला परंतु भारतामधून तो कमी प्रमाणात स्वीकारला गेला. बौद्ध धर्म हा चिक्कीसेवर आधारित असून विज्ञाननिष्ठ आहे. त्याचा स्वीकार केल्याशिवाय आपल्याला कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रहित साधता येणार नाही असे उद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक संभाजी देसाई होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.भारत कसबे, सूत्रसंचालन डॉ.अजित कांबळे तर आभार शशिकांत गायकवाड सर यांनी मानले. 
       या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी नायब तहसीलदार कमलाकर भादुले,बहुजन हितकारणी संस्थेचे अध्यक्ष आयु.दगडू बनसोडे.उपाध्यक्ष आयु.उत्तम मस्के, प्रा. जगन्नाथ ननवरे तसेच सर्व वडूज नगरीतील नागरिक, बहुजन हितकारणी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, भिमाई महिला मंडळ, डॉ.अशोक तासगावकर, डॉ.प्रवीण चव्हाण, डॉ.कुंभार, प्रा.डाॅ.भोसले, प्रा. भुजबळ, प्रा.खरटमोल, प्रा. डावरे,बाळासाहेब किरतकुडवे, भीमराव कांबळे, पोटफोडे सर, सावंत सर, बनसोडे सर, बनसोडे केंद्रप्रमुख,होकळे मॅडम, वाघमारे सर, गायकवाड सर, सचिन जगताप साहेब, त्याचबरोबर शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त