शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा

सातारा : शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 मार्च रोजी रात्री 11 वाजता ते 31 मार्च रोजी दुपारी 5 वाजण्याच्या दरम्यान हॉटेल बबल्स परमिट रूम बियर बार या राजलक्ष्मी थिएटर समोर असलेल्या बारमध्ये हर्षल (पूर्ण नाव माहित नाही) याने बारचे मालक प्रकाश मारुती खरात रा. दिव्य नगरी, शाहूपुरी, सातारा यांना फुकट दारू मागून तसेच दिलेल्या दारूचे पैसे मागितले असता त्याच्याकडे पिस्तूल असून त्यातून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी खरात यांना दिली. याचबरोबर कोयता दाखवून प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये खंडणी दिली नाही तर जिवे मारीन, अशी धमकी दिली. याबाबतचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार दळवी करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला