गोपाळ गणेश आगरकर सुधारक राज्यस्तरीय पुरस्काराचे टेंभू कराड येथे वितरण 

सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६६ व्या जयंती

कराड : सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६६ व्या जयंती निमित्त इंद्रधनु  विचारमंच फाउंडेशनच्या वतीने गोपाळ गणेश आगरकर  सुधारक पत्रकारिता पुरस्कार २०२२ चे पुरस्कारात वितरण.  टेंभू,ता. कराड,जि.सातारा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले

  यावेळी महाराष्ट्रातील ६ पत्रकारांना सुधारक कार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे ,सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंन्सल, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे,टेंभूचे सरपंच युवराज भोईटे,कराडचे तहसीलदार विजय पवार, कराड पंचायत समिती गट विकास अधिकारी मीना साळुंखे,  उद्योजक रामकृष्ण वेताळ, सुधारक शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 
   यावेळी सन २०२२ चा गोपाळ गणेश आगरकर सुधारक पुरस्कार सोलापूर येथील वरिष्ठ संपादक राजा माने,सातारा येथील दैनिक ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव,दैनिक सकाळ पुणे  उपसंपादक आशिष तागडे, कोकणसाद  लाईव्हचे कार्यकारी संपादक अर्जुन धस्के, झी २४ तास चॅनलचे सातारा जिल्हा प्रतिनिधी तुषार तपासे,दैनिक पुढारी कोल्हापूरच्या स्नेहा मांगुरकर यांना प्रदान करण्यात आला.


 
सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांची कर्मभूमी असलेल्या टेंभू येथील पत्रकारांच्या पुरस्कार सोहळा इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त विकास भोसले,नितीन ढापरे ,संदीप चेणगे, प्रमोद तोडकर, अशोक मोहने, माणिक डोंगरे यांच्या विशेष सहकार्याने पार पडला.

 

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त