नजर चुकवून घरात घुसायचा अन् चोरायचा लॅपटाॅप, आरोपी अटकेत

सातारा: अलीकडे चोरीचे वेगवेगळे फंडे समोर येत असून, एक चोरटा दिवसाढवळ्या नजर चुकवून घरात शिरून चोरी करत होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर हा चोरीचा नवा फंडा समोर आला. सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने त्याच्याकडून चोरीचा लॅपटाॅप, तीन मोबाइलसह स्पोर्ट बाइक हस्तगत केली.

दत्तात्रय उर्फ योगेश नंदकुमार खवळे (वय २३, रा. कोडोली, सातारा), असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील गोडोली आणि औद्योगिक वसाहतीमधील एका प्रशिक्षण केंद्रातून भरदिवसा एका चोरट्याने लोकांची नजर चुकवून मोबाइल आणि लॅपटाॅप चोरून नेला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी करत होते. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना चोरट्याचा सुगावा लागला. त्या अनुषंगाने सलग तीन दिवस पोलिसांच्या पथकाने ठिकठिकाणी चाैकशी केली. त्यावेळी संशयित खवळे हा किती वाजता जातो, येतो याची माहिती पोलिसांनी मिळवली. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून खवळे याला रविवारी रात्री साडेदहा वाजता दत्तनगर, कोडोली येथे अटक केली. त्याने चाेरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी एक लॅपटाॅप, तीन मोबाइल, स्पोर्ट बाइक, असा सुमारे १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अशाच पद्धतीने त्याने शहरात इतर ठिकाणीही चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. या अनुषंगाने त्याच्याकडे पोलिस कसून चाैकशी करत आहेत.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी, सागर गायकवाड आदींनी ही कारवाई केली.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com
esataranews.com

स्थानिक बातम्या

सातार्‍यातील  कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल

सातार्‍यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल

स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई

स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई

चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..

चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील यश निकम,समृद्धी शिंदे यांची आशियाई बॉक्सींग क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासीक कामगीरी

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील यश निकम,समृद्धी शिंदे यांची आशियाई बॉक्सींग क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासीक कामगीरी

मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात  गुन्हा दाखल.

मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.

तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त