दहिवडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

दहिवडी : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती दहिवडी मध्ये मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली.सकाळपासून बाजार पटांगणावर धर्मवीर संभाजीराजे व्यासपीठावर अहिल्यादेवीच्या पुतळ्याचे पूजन करून या जयंती उत्सवास सुरुवात झाली. दुपारच्या काळात गजी नृत्य मंडळांनी गजी नृत्य सादर करत या कार्यक्रमाला शोभा आणली.सायंकाळी चारच्या सुमारास पावसाच्या व्यत्ययानंतरही अहिल्यादेवींचा पुतळा रथामध्ये ठेवून वाजत गाजत दहिवडी कॉलेज पासून बाजार पटांगणापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.दरम्यान पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी धनगरी वेशभुषा व राजमाता अहिल्यादेवींची वेशभुषा सुचिता गोरड यांनी सर्वांना आकर्षित केले.

 यावेळी माण- खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे, सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक अर्जुनतात्या काळे, आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे, राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान माण खटावचे अध्यक्ष अमृत चौगुले, उपाध्यक्ष वैभव महानवर, रघुनाथ भिसे,बाळासाहेब शिंगाडे, सुशांत जानकर, सुधीर गलांडे, कैलास दडस, अण्णासाहेब कारंडे, विशाल खताळ, सागर गलंडे, सुरेश गलंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त