विद्यार्थीनी,शिक्षिका व अधिकारी अशी तीन रूपे वडूजकरांनी पाहिली सौ.विजया बाबर यांचा गुणगौरव

Vadujkar saw the three forms of student, teacher and officer Mrs. Vijaya Babar's merit
या सेवानिवृत्त सत्कार समारंभ ला प्रा नागनाथ स्वामी, सतिश शेटे, धनंजय क्षिरसागर, पांडुरंग तारळेकर,आनंदा साठे, प्रशांत फडतरे, सुधीर पवार,केदार जोशी, दत्ता इनामदार, मुन्ना मुल्ला, समीर तांबोळी, शरद कदम, डॉ विनोद खाडे, महेश गिजरे, खुस्पे, शंकर सावंत,,यमगर,भोसले, स्वप्नील माळी व वडूज सहाय्यक निबंधक कार्यालयातील कर्मचारी व इतर वर्ग उपस्थित होते

वडूज : विद्यार्थी, शिक्षिका व खटाव सहाय्यक निबंधक अशी वडूज नगरीत तीन रूपे एका कर्तबगार महिला अधिकाऱ्यांकडून पाहण्यास मिळाली आहे. अशा शब्दात अनेक मान्यवरांनी वडूज ता खटाव येथील सहाय्यक निबंधक सौ विजया बाबर यांचा सेवानिवृत्त निमित्त  गुणगौरव केला.सहकार क्षेत्रात कार्यरत असताना नियम व शिस्तबद्ध कामगिरी बजावली आहे. कोणाचीही तक्रार नाही. आज अनेक कामांमुळे अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये समनव्यातुन असणे गरजेचे आहे. हीच भूमिका घेऊन सौ बाबर यांनी कार्य केले. हिंदी भाषेत शिक्षण देणाऱ्या या शिक्षिकांनी वडूज, आटपाडी, कुरोली या ठिकाणी पंधरा वर्षे सेवा करून नंतर सहकार क्षेत्रात अधिकारी होण्याचा मान मिळविला. त्यांची प्रेरणा घेऊन माता-भगिनींनी कार्य करावे. या वाटचालीत श्री अनिल बाबर यांची मोलाची साथ मिळाली आहे.या सेवानिवृत्त सत्कार समारंभ ला प्रा नागनाथ स्वामी, सतिश शेटे, धनंजय क्षिरसागर, पांडुरंग तारळेकर,आनंदा साठे, प्रशांत फडतरे, सुधीर पवार,केदार जोशी, दत्ता इनामदार, मुन्ना मुल्ला, समीर तांबोळी, शरद कदम, डॉ विनोद खाडे, महेश गिजरे, खुस्पे, शंकर सावंत,,यमगर,भोसले, स्वप्नील माळी व वडूज सहाय्यक निबंधक कार्यालयातील कर्मचारी व इतर वर्ग उपस्थित होते.पाच वर्षांच्या काळात माण-खटाव तालुक्यात त्यांनी काम करताना कर्मचाऱ्यांना पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अनेक प्रकरणी सहकारातील काहींनी न्यायालयात धाव घेतली.त्याला ही तोंड दयावे लागले आहे.भविष्यात लेखन, गायन व इतर छंद त्यांनी जोपासले पाहिजे यासाठी त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयामध्ये विद्यार्थिनी व .छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये शिक्षिका व नंतर लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी झाल्या. शिक्षिका म्हणून कुरोली व वडूज येथे काम केले व प्रशासकीय अधिकारी म्हणून सोलापूर, वडूज ,दहिवडी ,आटपाडी ,विटा येथे काम पाहिले.खटाव तालुक्यातील दोन महिला अधिकारी पूर्वी शिक्षिका होत्या. त्यांचा आदर्श शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी घेतला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला