महाबळेश्वर मध्ये दाट धुक्याचा अंदाज न आल्याने कार दरीत कोसळली! सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

महाबळेश्वर : गेल्या काही दिवसापासून महाबळेश्वर पाचगणी मध्ये पावसाची रिमझिम आणि धुक आणि ऊन याचा लफंडाव पाहायला मिळत आहे हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून पर्यटक महाबळेश्वरला भेट देऊ लागले आहेत अशातच नवीन लोकांना येथील रस्त्यांचा अंदाज न आल्याने अपघात सुद्धा घडत आहेत असाच एका  अपघातात महाबळेश्वर तापोळा रोडवरील भारत हॉटेल जवळील दाट धुक्याचा अंदाज न आल्याने हुंडाई क्रेटा कार थेट अंदाजे २० फुट दरीत कोसळली. सुदैवाने कोणतिही जिवीत हानी झाली नाही. मोटारीतील चालक व इतर प्रवासी सुखरूप बचावले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ .३० दरम्यान घडली. पाऊस व दाट धुके असल्याने भारत हॉटेल पुढे महाबळेश्वर कडे येत असताना वळणाचा अंदाज न आल्यामुळे सदरची घटना घडली. वाहन दरीत कोसळून पलटी झाले सुदैवाने चालक रमेश सांळुखे रा. इस्लामपुर यांच्या सह एक पुरुष, दोन महिला व तीन लहान मुले होती. सदर वाहन क्र एम् एच् ४७ बी के ३५४० हुंडाई क्रेटा कंपनीचे आहे. सदर वाहन क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. या मदत कार्यात महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस जितेंद्र कांबळे व सलिम सय्यद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com
esataranews.com

स्थानिक बातम्या

सातार्‍यातील  कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल

सातार्‍यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल

स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई

स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई

चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..

चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील यश निकम,समृद्धी शिंदे यांची आशियाई बॉक्सींग क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासीक कामगीरी

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील यश निकम,समृद्धी शिंदे यांची आशियाई बॉक्सींग क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासीक कामगीरी

मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात  गुन्हा दाखल.

मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.

तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त