महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजप वगळून समविचारी पक्षांशी युती करू.... शशिकांत शिंदे
Satara News Team
- Thu 13th Nov 2025 08:17 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्ह्यात महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजप वगळून समविचारी पक्षांशी युती करून निश्चित चांगली लढत देऊन असा आत्मविश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.येथील राष्ट्रवादी भवनामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी शशिकांत शिंदे म्हणाले, साताऱ्यातील सुसंस्कृत वर्ग तसेच तरुण-तरुणी यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला चांगला प्रतिसाद आहे. इतर मागास प्रवर्गाचे प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीला नाकारून राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या समविचारी पक्षांना साथ देत आहे,ओबीसीच्या संदर्भाने राज्य शासनाने बरेच उलट सुलट निर्णय घेऊन संभ्रमावस्था निर्माण केली आहे त्यामुळे या प्रवर्गामध्ये असंतोष आहे. सातारा शहरातही महाविकास आघाडी जास्तीत जास्त उमेदवार उभे करून पूर्ण ताकतीने सातारा जिल्ह्यात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाला गळती लागली म्हणजे संपले असे नाही.महाविकास आघाडी सातारा जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे पुन्हा आपल्या अस्तित्व निर्माण करेल भारतीय जनता पार्टी सोडून कोणत्याही समविचारी पक्षांशी आमची युती असणार आहे. स्थानिक समीकरणांना महत्त्व देऊन आणि जनमताचा कानोसा घेऊन जन मान्यतेने उमेदवार दिले जात आहेत असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. साताऱ्याचे बारा वर्ष एकाच ठिकाणी असणारे मुख्याधिकारी तसेच नेत्यांच्या मर्जीतील नगराध्यक्ष अशा विविध प्रश्नांवर बोलते केले असता शशिकांत शिंदे म्हणाले महाविकास आघाडीची जर सत्ता साताऱ्यात आली तर घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही जरूर केली जाईल. नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक व दिग्गज आमच्या संपर्कात आहे. मात्र बरेच काही आत्ताच सांगता येणार नाही आपण काही काळ प्रतीक्षा करावी परिणाम आपल्यासमोर दिसतील असे शिंदे यांनी स्पष्ट केले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणे हे जितके महत्त्वाचे तितकेच निवडणुकीत भूमिका घेणे महत्त्वाचे आहे आणि महाविकास आघाडीने त्या संदर्भात भूमिका घेतलेली आहे.
साताऱ्यातील बरेच नाराज मासे महाविकास आघाडीच्या जाळ्यात सापडल्याने साताऱ्यातील नगरपालिका निवडणुक अटीतटीचीच होईल असे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे.नाराज झालेल्या बंडोबांना थोपवण्यासाठी दोन्ही राज्यांची काठ्यावरची कसरत पाहायला मिळणार आहे.शशिकांत शिंदे नाराजांना घेऊन साताऱ्यात राजेना टक्कर देण्यात कितपत यशस्वी होतात हे पहावं लागणार आहे
स्थानिक बातम्या
महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजप वगळून समविचारी पक्षांशी युती करू.... शशिकांत शिंदे
- Thu 13th Nov 2025 08:17 pm
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Thu 13th Nov 2025 08:17 pm
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Thu 13th Nov 2025 08:17 pm
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Thu 13th Nov 2025 08:17 pm
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Thu 13th Nov 2025 08:17 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Thu 13th Nov 2025 08:17 pm
संबंधित बातम्या
-
कराड नगरपरिषदेसाठी गुरुवारी ६ उमेदवारांचे ८ अर्ज दाखल
- Thu 13th Nov 2025 08:17 pm
-
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Thu 13th Nov 2025 08:17 pm
-
प्रशांत खुसे-पाटील यांच्या रुपाने खटाव तालुक्याला मिळणार युवा नेतृत्व
- Thu 13th Nov 2025 08:17 pm
-
साताऱ्यात शिवसेना (उबाठा) आंदोलनाचा फुसका बार
- Thu 13th Nov 2025 08:17 pm
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Thu 13th Nov 2025 08:17 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Thu 13th Nov 2025 08:17 pm











