निवडणुकीतील भरकटलेली जनता, निर्ढावलेले नेते अन् व्यवसायीक राजकारण.
आशपाक बागवान.
- Fri 14th Nov 2025 12:34 pm
- बातमी शेयर करा
सातारा : जनतेची कामे नेत्यांनी करणे अपेक्षित असते तर त्याऊलट आज नेत्यांची कामे जनता करण्यात व्यस्त आहे. आपल्या कडे जनताच नेत्यांसाठी कामे करत आहे. अमुक जिल्हा परिषद अध्यक्ष बनेल की नाही? तमुक पंचायत समिती सभापती बनेल की नाही? अमुक च्या घरातील व्यक्ती पंचायत समिती सदस्य बनेल की नाही? तमुक च्या घरातील व्यक्ती जिल्हा परिषद सदस्य बनेल की नाही? अमुक ने तमुक ची आरक्षणातच जिरवली, तमुक ने अमुक वचपा काढला? जनता या मुद्द्यांवर भांडण्यात व्यस्त आहे. कोणता पक्ष सत्तेवर येणार यासाठी जनता भांडायलाही तयार आहे. पण् यांना कोण सांगणार जिल्हा परिषद दादाला अन् पंचायत समिती बापूला हि अंतर्गत साठेबाजी नेहमीप्रमाणेच फिक्सिंग असते. पण आवश्यक असलेली २४ तास विज, सुरळीत आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा, आपल्या शहरात लघुशंकेची सुविधा, सार्वजनिक शौचालये, उत्तम दर्जाची शासकीय शैक्षणिक सुविधा, उत्तम दर्जाची शासकीय वैद्यकीय सुविधा, ग्रामपंचायतेची सौरऊर्जा मधून बचत, गुणवत्तापुर्ण रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटर व्यवस्था आणि त्यांची वेळेवर सफाई यासाठी भांडायला, विचारायला जनता तयार नाही. राजकारण्यांकडून या ज्या निवडणूका लढविल्या जातात त्या कोणत्या जमीन अथवा भू-भागाच्या क्षेत्रावर ताबा मिळविण्यासाठी होत नाहीत. तर आपल्या मेंदूला ज्या कठिण आवरणाने सुरक्षित केलेले आहे. त्याला भेदून मेंदूवर ताबा मिळविण्यासाठी लढल्या जातात. जो जितक्या जास्त खोपडींवर ताबा मिळवतो तो सत्ता स्थापन करतो हे नक्की आहे.
यामुळे प्रश्न त्याच्याही पुढे जाऊन महत्वाचा हा आहे की जनतेसाठी कोण काम करणार? दादा, बापू, बाबा हे त्यांच्या पिढ्यानपिढ्या तुमच्या उरावर बसविण्यात व्यस्त आहेत. जेंव्हा जनता स्वतः हे ठरवेल कि नेत्यांनी आपल्यासाठी काम करायला पाहिजे. नेत्यांना आपल्या मुलभूत हक्क आणि सुविधां विषयी जनता जोपर्यंत प्रश्न नाही विचारत तोपर्यंत तो आपल्यासाठी काम नाही करणार. मग जनता हेच बोलत बसणार कि नेता पाच वर्षांतून एकदा मतं मागण्यासाठी येतो आणि निघूनही जातो. जनतेने त्यांना काम करण्यासाठी मतदान नाही केले. काहींनी, जात बघून मतदान केले, काहींनी धर्म बघून मतदान केले, तर काहींनी घराणेशाही बघून मतदान केले. आणि त्याहूनही विचित्र बाब म्हणजे नेता डिफेंडर घेऊन आला, फॉर्च्युनर घेऊन आला, मर्सिडीज घेऊन आला किंवा अमुक ब्रॅण्ड च्या महागड्या गाड्यांनी आला होता हे पाहून जनता आनंदी होताना दिसते. ही गोष्ट आनंदी होण्यासारखी नाही. तर जनतेने विचार करण्याची गरज आहे कि तो नेता १ करोड ते ५ करोड च्या गाडीतून कसा फिरतोय? कोणाचा पैसा आहे तो? कोठून इतका पैसा कमवल? कोणाला अश्व लाऊन ५ - ५० गाड्यांचा ताफा घेऊन फिरतोय? त्याचा कोणता असा व्यवसाय आहे की ज्याच्या माध्यमातून तो राजकारणात येण्यापूर्वी पत्र्याच्या शेडमध्ये होता अन् राजकारणात आल्यावर नातेवाईकांसह सर्वांच्या नावाने अमाप प्रॉपर्टी तयार केली? त्याने कधी घरातील व्यक्ती सोडून स्वखर्चाने एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन सत्तेची खुर्ची दिली? कधी जनतेजवळ एखादा निष्कलंक, चारित्र्यवान कार्यकर्ता जो कि साधारण राहणीमान, उच्च आणि विकासात्मक दुरदृष्टी ठेवणारा असा सामान्य कुटुंबातील व्यक्ती साध्या वाहनातून उमेदवार म्हणून आला तर त्याला तीच सामान्य जनता काहीही किंमत देत नसते. पण ५ - ५० गाड्यांचा ताफा घेऊन आला तर म्हणणार व्वा..... नेता आला... हि सद्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते.
विकला जाणारा मतदार तुटपुंज्या पैशांसाठी आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या पाच वर्षाच्या कालावधीचा व्यापार हा अशा राजकारणी व्यवसायीकां सोबत करतात ज्याच्यामुळे तुम्हाला निवडणुकीत दान रूपी मताची किंमत देऊन येत्या पाच वर्षांत हजारोंच्या पटीने परतावा मिळवतो जे त्यामध्ये एकप्रकारे गुंतवणूक करत असतात. जे मतदार एखाद्या घराणेशाही ने माजलेल्या मस्तवाल हत्ती रूपी गाढवाशी लढू शकत नाही. तेच मतदार संविधानातील हक्काचा वापर करून लोकशाहीच्या मार्गाने त्यांना नक्कीच पाडू शकतात.
@political
@election
स्थानिक बातम्या
निवडणुकीतील भरकटलेली जनता, निर्ढावलेले नेते अन् व्यवसायीक राजकारण.
- Fri 14th Nov 2025 12:34 pm
महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजप वगळून समविचारी पक्षांशी युती करू.... शशिकांत शिंदे
- Fri 14th Nov 2025 12:34 pm
वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत
- Fri 14th Nov 2025 12:34 pm
निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
- Fri 14th Nov 2025 12:34 pm
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Fri 14th Nov 2025 12:34 pm
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Fri 14th Nov 2025 12:34 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Fri 14th Nov 2025 12:34 pm
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Fri 14th Nov 2025 12:34 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Fri 14th Nov 2025 12:34 pm
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Fri 14th Nov 2025 12:34 pm
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Fri 14th Nov 2025 12:34 pm
-
फलटण येथील गणेश मूर्ती विटंबनेप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करा .
- Fri 14th Nov 2025 12:34 pm












