वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन नागरिकांचे गहाळ झालेले सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत

पुसेसावळी : मा. पोलीस अधिक्षक, सातारा तुषार दोशी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग श्री. रणजित सांवत यांचे मार्गदर्शनाखाली वडुज पोलीस ठाणेचे मा. पोलीस निरिक्षक श्री.घनश्याम सोनवणे यांनी हरविलेले मोबाईल शोध घेणेकामी पो.हवा. शिवाजी खाडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका पवार यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पो.हवा. शिवाजी खाडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका पवार यांनी सी.ई.आय.आर पोर्टल व इतर तांत्रिक बाबीचे आधारे महाराष्ट्रासह व इतर राज्यातुन हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहीम राबविल्याने वडुज पोलीस ठाणे हद्दीतुन गहाळ झालेले एकूण ४,३२,०००/- रुपये किंमतीचे एकुण २४ मोबाईल हस्तगत करण्यात यश आले असून मा. अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर यांचे उपस्थितीत सदरचे हस्तगत केलेले मोबाईल मुळ मालकांना सुपुर्द करण्यात आले. सदरची मोहीम वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने राबवण्यात येणार असल्याने वडुज पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. घनश्याम सोनवणे यांनी सांगितले आहे.

    सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक, सातारा तुषार दोशी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग श्री. रणजित सांवत, पोलीस निरिक्षक श्री. घनश्याम सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा. शिवाजी खाडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे, कुंडलिक कटरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका पवार यांनी केलेली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला