निवृत्त शिक्षकाच्या प्रकरणात साताऱ्यात वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यास २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

सातारा : एका निवृत्त शिक्षकाच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी आज मोठी कारवाई केली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सातारा येथील वरिष्ठ सहायक वैशाली शंकर माळी (वय ३७) यांना तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

   निवृत्त तक्रारदारांना त्यांच्या २५ वर्षांच्या सेवा कालावधीतील अर्जित रजेचे रोखीकरण व सेवानिवृत्तीचे लाभ मंजूर करून देण्यासाठी आरोपी माळी यांनी तक्रारदाराकडे २५ हजारांची लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले. आरोपीविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 या पथकात प्रवीण निंबाळकर (पो. नि.), मंगेश व्हटकर (पो. हे. कॉ.), संतोष माळी (पो. ना.), श्री. सुनील पाटील (पोलीस निरीक्षक) आणि इतर अंमलदार यांचा समावेश होता.

  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्यांनी तात्काळ एसीबी, सातारा यांच्याशी संपर्क साधावा.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला