पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...

१ लाख रुपयांचे १८ लाख ५० हज्जार वसुलीसह राहते घर हडप करणाऱ्या खाजगी सावकारावर गुन्हा दाखल

पुसेसावळी : पुसेसावळी येथील खाजगी सावकाराकडून १ लाख रूपयांच्या व्याजापोटी कळंबी ता. खटाव येथील बाबासो सुतार वय वर्षे ७५ यांचेकडून १० वर्षात राहते घर आणि सुमारे १८ लाख ५० हज्जार रूपयांची वसुली करण्यात आली. तरीदेखील मुद्दल आणि व्याजाची मागणी करत संबंधित पिडित कुटुंबाला दमदाटी होत असल्याची फिर्याद दिल्याने उदय आनंदराव माळवे, रा. पुसेसावळी (लक्ष्मीनगर) याचे विरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ च्या कलम ३९ व ४५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये औंध पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १४८/२०२५ दाखल करण्यात आला आहे. 

            याबाबत पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार उदय आनंदराव माळवे रा. लक्ष्मीनगर (वंजारवाडी) हा फिर्यादी च्या ओळखीचा असुन तो व्याजावर पैसे देण्याचे (खाजगी सावकारीचे) काम करतो.  फिर्यादीचे पुसेसावळी येथे दारे व खिडक्या बनवण्याचे दुकान असुन उदय आनंदराव माळवे हा आमचे दुकानात येत जात होता. मी १०/०८/२०१५ रोजी वंजारवाडी ता. खटाव येथील सावकार उदय आनंदराव माळवे याचेकडुन एक लाख

रुपये व्याजावर घेतले होते. त्यावर १० टक्के व्याजदर मासिक ठरला होता त्या प्रमाणे मी सहा ते सात महिने व्याजाची रक्कम त्याला दिली होती. त्यानंतर मला व्याजाची रक्कम दिड वर्ष परतफेड करता आली नाही. त्यामुळे मी सन २०१७ मध्ये बँक ऑफ इंडियाचे ७ लाख रुपयाचे कर्ज काढले होते. त्यावेळी दिड वर्षे थकलेली व्याजाची रक्कम व मुद्दल असे मिळुन तीन लाख रुपये मी उदय आनंदराव माळवे याला दिले होते. दरम्यानचे काळात उरलेली कर्ज व व्याजाची रक्कम देण्याकरता उदय आनंदराव माळवे याने माझी मौजे कळंबी येथील जमीन गट नंबर १७६,१७७ व १७८ मधील दिड एकर जमीन जबरदस्तीने विकायला लावली. त्या विकलेल्या जमीनीच्या पैशातील चार लाख रुपये मी त्याला दिले होते. तसेच, माझे गावातील राहते घर हे उदय आनंदराव माळवे याने त्याचे आईचे नावावर खरेदी खत करायला लावले होते. ते मी त्याचे आईचे नावावर व्याजाचे पैशांच्या मोबदल्यात दिले होते. तसेच माझे गावातील नवीन दुसरे घराची नोटरी दि. १०/१०/२०१७ रोजी तारण गहाण खत उदय आनंदराव माळवे याने माझा मुलगा नामदेव बाबासाहेब सुतार याचे कडुन त्याचे स्वताचे नावावर करुन घेतली होती. त्यानंतर दि २८/०६/२०१८ रोजी उदय माळवे याने माझे कडुन सात लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम घेवुन सदरचा तारण गहाण खत रदद केला होता. त्याने असे वारंवार कर्ज व व्याजाची रक्कम असे मिळुन एक लाख रुपये कर्जाचे मी उदय आनंदराव माळवे याला रोख व इतर स्वरुपात जुने घर व नवीन घराची नोटरी असे त्याचे व त्याची आई यांचे नावावर करुन दिलेले आहे. तसेच व्याजाची रक्कम देणेकरता पैसे नसलेने मी बंधन बैंक कराड व कॅनरा कॅपीटल बँक कराड यांचेकडुन कर्ज काढुन उदय आनंदराव माळवे याला चार लाख रुपये दिले होते. तरीही अद्याप एक लाख रुपये मुद्दल व व्याज फिटलेले नाही असे म्हणुन उदय आनंदराव माळवे याने मला वारंवार दमदाटी करुन पैसे परत करण्याची धमकी दिली आहे. 

       दि १०/०८/२०१५ रोजी ते आज दि २५/१०/२०२५ रोजी सकाळी ०९.३० वा पर्यंत मौजे कळंबी, ता.खटाव, जि. सातारा येथे मी उदय आनंदराव माळवे रा लक्ष्मीनगर (वंजारवाडी) पुसेसावळी, ता. खटाव याचेकडून १ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेवुन त्याची परतफेड न झालेने माझे कडुन माझे गावातील राहते घर खरेदी खताने उदय आनंदराव माळवे याने त्याचे आईचे नावावर करायला लावले, तसेच माझे गावातील नवीन दुसरे घराची नोटरी दि १०/१०/२०१७ रोजी तारण गहाण खत उदय आनंदराव माळवे याने माझा मुलगा नामदेव बाबासो सुतार याचेकडुन त्याचे नावावर करुन घेतली होती. त्यानंतर दि २८/०५/२०१८ रोजी उदय माळवे याने माझे कडुन सात लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम घेवुन सदरचा तारण गहाण खत रदद केला होता. तसेच माझे मौजे कळंबी येथील जमीन गट नंबर १७६,१७७ व १७८ मधील दिड एकर जमीन जबरदस्तीने विकायला लावुन विकलेले जमीनीच्या पैशातील चार लाख रुपये घेतले आहेत. तसेच बँक ऑफ इंडियाचे ७ लाख रुपयाचे कर्ज काढले त्यावेळी दिड वर्षे थकलेली व्याजाची रक्कम असे मिळून तीन लाख रूपये असे उदय माळवे याचेकडुन घेतलेल्या १ लाख रुपयांचे एकुण १८ लाख ५० हजार रुपये मी उदय आनंदराव माळवे यास व्याज स्वरुपात दिलेले आहेत. तरीही मुद्दल व व्याज मागुन दमदाटी करुन मला व माझे कुटुंबातील लोकांना धमकी दिली आहे. म्हणून बाबासो गणपती सुतार वय ७५ वर्षे, जात-हिंदु सुतार, व्यवसाय-सुतारकाम/शेती रा. कळंबी, ता.खटाव, जि.सातारा यांनी औंध पोलिस ठाण्यात उदय आनंदराव माळवे, रा. लक्ष्मीनगर (वंजारवाडी) पुसेसावळी, ता. खटाव, जि. सातारा याचे विरुद्ध फिर्याद दिली आहे


"मा.स.पो.नि.गणेश वाघमोडे, म्हणजे पिडितांसाठी आशेचा किरण...

     औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत बहरलेले खाजगी सावकारीचे पिक हे नव्याने उदयास आलेले नसून यापुर्वी कार्यरत असलेले स.पो.नि. दत्तात्रय दराडे यांनी अशा प्रवृत्तीच्या मुसक्या आवळत दरारा आणि सामान्य माणसांच्या मनात आदर निर्माण केला होता. त्यानंतर आलेल्या वाळवेकर यांची कारकिर्द पुसेसावळी हत्याकांड तपासात गेली. तर चिमणाजी केंद्रे यांनी अधिकाराच्या गैरवापराचे धडे गिरवल्याचे आणि अविनाश मते यांची कारकिर्द तर अपना काम बनता, भाड में जाए जनता ला साजेसे काम करत कर्मचाऱ्यांचे शोषण करण्यात घालवल्याने हे खाजगी सावकारीचे पिक जोमाने वाढले होते. त्यामुळे प्रशासनावर विश्वास ठेवून अन्यायाविरुद्ध न्याय मागायला ही पिडितांना भिती वाटत होती. परंतू विद्यमान कारभारी गणेश वाघमोडे यांनी पहिल्यांदाच अशा गुन्ह्याची नोंद घेतल्याने पिडितांमध्ये न्याय मिळवून घेण्यासाठी आशेचा किरण दिसला असल्याची चर्चा सुरू आहे. संबंधित उदय माळवे सह अन्य खाजगी सावकारांच्या पाशात अडकून उध्वस्त झालेल्यांची तक्रारी दाखल करण्याची मानसिकता तयार झाल्याने आणखीन तक्रारी दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे खाजगी सावकारांचे धाबे दणाणले असून गुन्हा दाखल झाल्याची माहिती लागताच अनेक सावकार फरार झाल्याची चर्चा सुरू आहे.


 " खाजगी सावकारी बाबत पिडितांनी तक्रार दाखल करण्याचे स.पो.नि.वाघमोडे यांनी केले आवाहन.

  औंध पोलिस ठाण्याचे हद्दीतील खाजगी सावकारीचे बळी ठरलेल्यांनी निःसंकोचपणे पुराव्यानिशी समक्ष माझी भेट घेऊन आपल्या अडचणी आणि होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती देऊन खाजगी सावकारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई  करणे आणि एक लोकसेवक म्हणून आपली सेवा करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन औंध पोलिस ठाण्याचे मा.सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी सातारा न्यूज च्या माध्यमातून नागरिकांना केले आहे.


आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला