आद्यरेखा प्रात्यक्षिक राजगिरा कुकीज तयार करण्याचे प्रशिक्षण सासपडे येथे संपन्न

देशमुखनगर : भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव ता . सातारा तर्फे आद्यरेखा प्रात्यक्षिक राजगिरा कुकीज तयार करण्याचे प्रशिक्षण सासपडे ता . सातारा येथे घेण्यात आले. यासाठी आवश्यक असणारी सामग्री कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव कडून देण्यात आली होती. या प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेले मार्गदर्शक डॉ. कल्याण बाबर विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव यांनी राजगिऱ्याचे आहारातील महत्त्व तसेच त्यापासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित पदार्थांची माहिती, प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची माहिती उपस्थितांना सांगितली तसेच दुपार सत्रात राजगिरा कुकीज तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. श्री संतोष चव्हाण, कृषी सहाय्यक, सासपडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची व मार्केटिंग बद्दल माहिती दिली. तसेच यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मुंबई यांचा राज्यस्तरीय मधुमित्र पुरस्कार 2024 नारायण कृष्णा डांगे, सासपडे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. सारिका भोसले आणि सौ. स्वाती जाधव, सहयोगीनी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रगती लोकसंचालित साधन केंद्र सासपडे, सातारा यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रशिक्षणासाठी सासपडे येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. स्वाती जाधव आणि आभार प्रदर्शन श्री. संतोष चव्हाण यांनी केले

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त