वर्णेच्या तलाठ्यांसह मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

वर्णे : वर्णे ता.जि. सातारा गावच्या हद्दीत तलाठी किरण अहिरेकर वय 40 वर्षे हे तलाठी म्हणून कार्यरत असून अहिरेकर हे तलाठी कार्यालयात शासकीय काम करीत असताना अमन विष्णू पवार वय अंदाजे 35 वर्षे राहणार वर्णे तालुका जिल्हा सातारा याने तलाठी अहिरेकर यांना उद्देशून एकेरी भाषेत तलाठी माझ्या गटाचे उतारे लगेच दे असे म्हणाला यावर अहिरेकर यांनी त्यास माझे दुसरे काम चालू आहे तुम्ही थोडा वेळ थांबा असे सांगितले तेव्हा पवार याने त्यांच्या समोरील कागदपत्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अहिरेकर यांनी समजावण्याचा प्रयत्न करत असताना पवार याने अहिरेकर यांच्या कानाखाली मारून दोन्ही हाताने कॉलर धरून गळ्यातील ओळखपत्राची लेस तोडली व  आई बहिणी वरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत तुला जीवे सोडणार नाही अशी धमकी देऊन  शासकीय कामात जाणीवपूर्वक अडथळा आणत सरकारी कर्मचाऱ्यांस मारहाण केल्याकरणी बोरगाव पोलीस ठाण्यातक्षगुरनं व कलम 282/2024 ipc353,332 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून स.पो.नि.रविंद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.स्मिता पाटील अधिक तपास करत आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त