अनैतिक संबंधाचे तीन बळी...

पुणे : फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. एका मागून एक उघडकीस येणाऱ्या घटना फक्त चर्चा नव्हे तर चिंता आणि चिंतन करायला भाग पाडत आहेत. अशीच घटना पिंपरी(पुणे) येथे घडली.एक विवाहिता अनैतिक संबंधातून गर्भवती राहिली. ही बाब तिने प्रियकराला सांगताच त्याने गर्भपात करण्यास सांगितले. गर्भपात करण्यासाठी ही विवाहिता तिच्या दोन्ही लहान मुलांना घेवून घराबाहेर पडली. 12 वीचा फाँर्म भरण्यासाठी जात असल्याचे तिने कुंटुंबाला सांगितले. परंतु ती प्रियकराच्या मित्रासोबत थेट कळंबोली(ठाणे) येथील खाजगी रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी गेली. गर्भपात करताना डाँक्टरांच्या हालगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला. ही बाब प्रियकराला कळताच त्याने एंजट महिला व मित्राच्या मदतीने विवाहितेचा मृतदेह व दोन्ही मुलांना मावळ मध्ये घेवून येण्यास सांगितले. विवाहितेचा मृतदेह प्रियकराने व मित्राने इंद्रायणी नदीत फेकला. आपल्या आईच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना पाहून दोन्ही मुलांनी रडून आरडाओरडा केला. यामुळे आपले बिंग फुटेल या भितीने संशयितांनी दोन्ही मुलांनाही इंद्रायणी नदीत फेकले. आणि संशयित पसार झाले. विवाहितेसोबत संपर्क होत नसल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून गुन्हा उघडकीस आणला. संशयिताना अटक करण्यात आली. परंतु या घटनेची आणखी एक बाजू समाजासमोर उभी राहिली. ती म्हणजे अनैतिक संबंध.... विवाहितेचे आणि संशयित प्रियकराचे असलेले अनैतिक संबंध....यातून झालेली 'गर्भधारणा' बदनामी चे कारण बनेल म्हणून गर्भपात करण्याचा प्रयत्न झाला. या प्रयत्नात विवाहितेचा मृत्यू तर झालाच पण काही एक चुक नसताना दोन लहान जीव मारण्यात आले. खरंच ही घटना विचार करायला भाग पाडत आहे. अनैतिक संबंध हा शब्द आजच्या काळात नवीन राहिलेला नाही. काही विवाहित स्त्री किंवा पुरुष यांचे असणारे अनैतिक संबंध संसार तुटण्यासाठी कारणीभूत आहेत. यामुळे निर्माण झालेल्या वादात मुले भरडली जात आहेत.व बघता बघता संपूर्ण कुंटुंब व्यवस्था कोलमडून पडत आहे. याला जबाबदार कोणाला धरायचे....? या प्रश्नाचे उत्तर सहजासहजी कोण देणार नाही. कारण विवाहबाह्य संबंध ठेवणारे स्त्री आणि पुरुष दोघेही जबाबदार असतात. या पाठोपाठ तरुण तरुणीमध्ये लिव्ह इन रिलेशनशीप चे प्रमाण वाढत आहे. यातूनही गर्भधारणा, गर्भपात करण्यात येतात. शारीरिक संबंधातून मानसिक समाधान मिळावे हे या मागचे मुख्य कारण आहे. मात्र यांचे होणारे विपरीत परिणाम आणि अशा घटना अनैतिक संबंधाचे बळी ठरत आहेत, हे नाकारुन जमणार नाही...!

 

गौरी आवळे, संस्थापिका-अध्यक्षा 'वीरांगना प्रतिष्ठान'

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त