रेकॉडवरील तडीपार गुंडास पिस्तूल व जिवंत काडतुसासह अटक

कराड  ; सातारा-सांगली जिल्ह्यातून तडीपार असतानाही त्याचे उल्लंघन करून कराड परिसरात वावरत असलेल्या गुंडाला सापळा रचून कराड पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने त्याच्याकडील पिस्तूल व जिवंत काडतूसासह अटक केली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने आत्तापर्यंत तब्बल 91 पिस्तुले जप्त केली आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्हयामध्ये गुन्हेगार व त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी सक्त सुचना केल्या आहेत. सातत्याने ठोस पावले उचचली आहेत. सातारा जिल्हयातील गुन्हेगारी नियंत्रणाकरीता अवैध शस्त्र खरेदी-विक्री व बाळगणाऱ्यांविरुध्द विशेष मोहिम सुरुवातीपासुन राबविली आहे. दि.२३ जुलै २०२४ रोजी कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर , यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ मध्ये हद्दपार असलेला अभिलेखावरील गुन्हेगार इसम नामे निशिकांत निवास शिंदे रा. रेठरेकर कॉलनी कराड हा त्याचे राहते घरी येणार असुन, तो त्याचेसोबत पिस्तूल बाळगुन असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

सदर बातमीप्रमाणे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षकअमित बाबर यांना इतर अंमलदार यांना सोबत घेवुन सापळा रचुन कारवाई करणेबाबत आदेश दिला. त्याप्रमाणे पोलीस पथकाने संशयीताचे घराचे दुतर्फा सापळा रचून व दबा धरुन अभिलेखावरील व तडीपार असलेला गुन्हेगार निशिकांत निवास शिंदे रा. रेठरेकर कॉलनी कराड यास देशी बनवाटीचे पिस्तूल (किंमत अंदाजे रु.७५०००/- ) व दोन जिवंत काडतुसे (किंमत अंदाजे रु.१२००) व मोबाईल फोन (किंमत अंदाजे रु.१००००/-) यासह ताब्यात घेतले. अटक केलेल्या संशयित निशिकांत शिंदे याला संपूर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्हयाचे शिराळा, वाळवा, कडेगाव, आटपाडी तालुक्यांचे हददीतुन दोन वर्षांकरीता हददपार करण्यात आले होते. संशयिताविरुध्द कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोउनि देवकर हे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त