24 जुलै पासून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या तालुका निहाय स्पर्धा आयोजन बैठका

सातारा : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, सातारा मार्फत सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विविध खेळाच्या विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करणे या कार्यक्रमांतर्गत तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.सन २०२४-२५ या वर्षातील तालुका क्रीडा व विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत तालुका निहाय बैठका आयोजित करण्यात येत आहेत.
बैठकीचे ठिकाण व संपर्क क्रमांक
१)श्री चंद्रकांत पाटील विद्यालय, सातारारोड 
तालुका  कोरेगाव बैठक दिनांक २४ जुलै २०२४ बैठक वेळ सकाळी ११:०० वा.
२)श्री सुनिल जाधव ९५०३३४७१८०
धनंजयराव गाडगीळ महाविद्यालय, सातारा
सातारा,२४ जुलै २०२४ दुपारी ३:०० वा.
श्री तुषार पवार ९२२५११९२९२
जावली
३)ज्ञानदीप इंग्लिश मिडी. स्कुल पसरणी
वाई२६ जुलै, २०२४
सकाळी ११:०० वा.
श्री सचिन लेंभे ९८८१५५५६११
४)बिलीमोरीया हायस्कुल पाचगणी
महाबळेश्वर २६ जुलै, २०२४ दुपारी ३:०० वा.
प्राचार्य श्री विशाल कानडे ८८२८३३३८२२
५)मालोजीराजे विद्यालय लोणंद
खंडाळा
२९ जुलै २०२४ सकाळी ११:०० वा.
श्री.महेश जाधव ९४२२६१६५६४
६)मुधोजी हायस्कुल फलटण
फलटण २९ जुलै, २०२४ दुपारी ३:०० वा.
श्री सचिन धुमाळ ९८९०३८२२०४
७)मेरी माता हायस्कुल, दहीवडी
माण ३० जुलै २०२४ सकाळी ११:०० वा.
श्री विष्णु काळेल ९६६५२२४३१३
८)राजा भगवंतराव ज्यु कॉलेज औंध
खटाव ३० जुलै, २०२४
दुपारी ३:०० वा.
श्री प्रमोद राऊत ९८८१९५८१०७
९)स्व. रा. की. लाहोटी कन्या प्रशाला कराड
कराड १ ऑगस्ट, २०२४ सकाळी ११:०० वा.
श्री महेंद्र भोसले - ९८५०८९९१००
१०)छत्रपती माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय तारळे
पाटण १ ऑगस्ट, २०२४ दुपारी ३:०० वा.
श्री दळवी ८३२९८३५८५५
या बैठकीमध्ये खालील नमूद विषयांवर चर्चा होणार आहे.
१. स्पर्धा आयोजनाची नियमावली २. तालुका व जिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबतची स्थळे व आयोजनास इच्छुक संस्था/ शाळा ३. तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धा वेळापत्रक ४. प्राथमिक प्रवेशिका ऑन-लाईन कार्यवाही ५. स्पर्धा आयोजन खर्चाबाबत माहिती, चर्चा व अडचणी ६. अल्पसंख्यांक खेळाडूंचा सहभाग वाढविणेबाबत ७. सर्वसाधारण / अनुसुचित जाती उपयोजना व्यायामशाळा व क्रीडांगण विकास अनुदान प्रस्ताव प्राप्त करणेकरीता योजनांची माहीती देणे ८. आयत्या वेळेचे विषय
या महत्त्वाच्या बैठकीसाठी आपल्या महाविद्यालयातील/शाळेतील क्रीडा शिक्षक/क्रीडा विभाग प्रमुखास वेळेत उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे.
स्पर्धा यशस्वी आयोजनाकरिता आपले नेहमीत अनमोल सहकार्य लाभते; त्याचप्रमाणे सन २०२४-२५ यावर्षीही अनगोल सहकार्य आणि मार्गदर्शनाची अपेक्षा आहे, या वर्षाच्या शालेय व इतर क्रीडा स्पर्धांतून खेळाडूंना योग्य मार्गदर्शन च वातावरण मिळवून देण्याचा व त्यांची कारकीर्द पुढे उज्वल करण्यासाठी आपण मिळून चांगले प्रयत्न करुन सातारा जिल्ह्याचे नांव उज्वल होईल, अशी कामगिरी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी आपण पत्रावर नमूद ई-मेल आय डी वर कोणत्याही अडचणी संदर्भात संपर्क केल्यास त्याचे उत्तर आपणांस ताबडतोब देण्याची व्यवस्था करण्यात येत आजे. तसेच शाळा/महाविद्यालयांचे ई-मेल आय. डी. देखील देण्याची व्यवस्था करावी.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडू, क्रीडा शिक्षक यांना तालुका व जिल्हा क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, स्पर्धेचे स्थळ, खेळाडू नोंदणी, प्रवेश शुल्क भरणे, स्पर्धांच्या भाग्यपत्रिका इ. बाबतची माहिती देण्यासाठी वेबसाईट तयार करण्यात आलेली असून, ही वेबसाईट आपण इंटरनेटवर .http://dsosatar.co.in/school/index.php या द्वारे उघडून माहिती पाहू शकता, या सुविधेचा देखील आपण सर्वांनी लाभ घ्यावा व सदर वेबसाईट सुरु असून, ऑनलाईन प्रवेश नोंदणे तसेच प्रवेश शुल्क भरण्याची अंतिम दिनांक - २० ऑगस्ट २०२४ अशी आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त